You are currently viewing सावंतवाडीतील प्रभाग क्रमांक ८ मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन

सावंतवाडीतील प्रभाग क्रमांक ८ मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन

आरोग्य सभापती ॲड. परिमल नाईक यांच्या माध्यमातून मंजूर विकासकामे

सावंतवाडी
सावंतवाडी नगरपालिकेचे आरोग्य व क्रीडा सभापती ॲड. परिमल नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या
प्रभाग क्रमांक ८ मधील विविध विकास कामांचे भूमिपूजन गुरुवारी करण्यात आले. यावेळी ॲड. परिमल नाईक, भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेविका भारती मोरे, माधुरी वाडकर, जेष्ठ पत्रकार गजानन नाईक, माजी नगरसेवक तानाजी वाडकर, पालिकेचे निवृत्त बांधकाम अभियंता तानाजी पालव, अशोक देसाई, बाळ बोर्डेकर, सतीश नाईक, विशाल सावंत, उमेश पाटणकर, यतीन तावडे, कळकुंद्रिकर, मुरगूड, बार्देस्कर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या विकास कामांमध्ये सर्वोदय नगर शिक्षक कॉलनी कामत घर ते पत्रकार गजानन नाईक घरापर्यंत रस्त्याच्या पृष्ठभागाचे नुतनीकरण करणे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर समोर हायवेला लागून गटार बांधकाम करणे, अली पानंद रस्ता ते सावंत गुरुजी घरापर्यंत रस्ता कोंक्रीटीकरण करणे,सावंतवाडी सर्वोदयनगर येथील डूबळे यांच्या घरासमोरील खुल्या जागेत उद्यान विकसित करणे तसेच पाटणकर घरापासून मुश्ताक राजगुरु घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे व गटार बांधकाम करणे या कामांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 5 =