You are currently viewing “किल्ले, डोंगरांना चढली हिरवळ; ट्रेकिंगसाठी उत्तम वेळ” : गणेश नाईक

“किल्ले, डोंगरांना चढली हिरवळ; ट्रेकिंगसाठी उत्तम वेळ” : गणेश नाईक

*”किल्ले, डोंगरांना चढली हिरवळ; ट्रेकिंगसाठी उत्तम वेळ”* *: गणेश नाईक*

सिंधुदुर्ग

पाऊस आला म्हणजे निसर्गाला नवी पालवीच येते. आकाशातील ढगांची गर्दी, गडकिल्ले, डोंगररांगा यांचे हिरवेगार रूप, ओथंबून वाहणारे धबधबे, गारवा देणारा वारा असे अल्हादायक वातावरण मन प्रसन्न करते. अशा या ऋतूमध्ये गडकिलल्यांचे ट्रेकिंग करणे ही खरोखरच एक अद्भुत अनुभूती आहे.

पावसाळ्यात डोंगरदऱ्या, किल्ले, टेकड्या यांना हिरवळ चढते. रस्त्यांवर, पायवाटांवर पावसाचे पाणी खळखळून वाहत असते. झाडांवर ओलसर गारवा जाणवत असतो. त्यामुळे अशा निसर्गसंपन्न ठिकाणी ट्रेकिंग करणे मनाला आल्हाददायक ठरते.

*पावसाळ्यातील ट्रेकिंगचे अनेक फायदे आहेत.*

▪️ पावसाळ्यात डोंगरदऱ्या, गड-किल्ले, जंगलं यांना एक वेगळीच टवटवीत हिरवळ प्राप्त होते. त्यामुळे मनाला ताजेतवाणेपणा व आनंद मिळतो. त्यामुळे निसर्गाच्या सान्नीध्यात वेळ घालवता येतो

▪️मानसिक स्वास्थ्यात सुधारणा:
निसर्गात चालणे, पक्ष्यांचा आवाज ऐकणे, पाण्याचे झरे पाहणे यामुळे तणाव कमी होतो, चिंता दूर होते आणि मन प्रसन्न होते. त्यामुळे मानसिक स्वास्थ्यात सुधारणा होते.

▪️पावसाळ्यातील चिखलट वाटा, पाणथळ रस्ते यामुळे चालताना शरीराचा अधिक वापर होतो. त्यामुळे पाय, पाठीचा कणा, फुफ्फुसे, हृदय यांचे उत्तम व्यायाम होते.

▪️ पावसाळी हवामानात वाटा ओलसर, थोड्याशा कठीण होतात. त्यामुळे अडचणींना तोंड देण्याची सवय लागते आणि धैर्य, आत्मविश्वास वाढतो.

▪️ पावसाळ्यात वातावरण स्वच्छ व धुळीविरहित असते. त्यामुळे शुद्ध हवा मिळते, जी फुप्फुसांसाठी चांगली असते. श्वसनाच्या आरोग्यासाठी हे लाभदायक ठरते.

▪️पावसाळी निसर्गात फुलणारी फुले, झरे, धबधबे, छोटे सरपटणारे प्राणी, विविध प्रकारची कीडे, पक्षी यांचे निरीक्षण करता येते. यामुळे फोटोग्राफी व निरीक्षण कौशल्य वाढते.

▪️ ग्रुप ट्रेकिंग करताना नवीन ओळखी होतात, जुने मित्र भेटतात, टीमवर्क आणि मदतीची भावना वाढीस लागते.

▪️शहरातील गोंगाट, कामाचा ताण, मोबाइल-स्क्रीनपासून दूर राहून मानसिक विश्रांती मिळते. रोजच्या धकाधकीपासून विरंगुळा मिळतो.

*पावसाळी ट्रेकिंग करताना काही काळजी घेणे खूप गरजेचे आहे.*

▪️ पावसाळ्यात योग्य कपड्यांची निवड करणे गरजेचे आहे. पावसात लवकर सुकणारे (Dry-fit) कपडे वापरा. शक्यतो पाण्यापासून वाचवणारा जॅकेट घालावेत.

▪️ घसरण टाळण्यासाठी मजबूत ग्रीप असलेले ट्रेकिंग शूज वापरावेत.

▪️ मोबाईल, कॅमेरा, पॉवर बँक यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ पाउच वापरावेत तसेच गरज असल्यास प्लास्टिक झिप लॉक बॅग वापरावी.

▪️पुरेसे पिण्याचे पाणी, हलकी स्नॅक्स, ऊर्जादायी खाण्याचे पदार्थ सोबत ठेवावेत. थकवा, डिहायड्रेशन याचा त्रास होऊ नये यासाठी मधूनमधून विश्रांती घ्यावीत.

▪️ पावसाळ्यात ओले दगड, माती, गवत यावर पाय घसरू शकतो. त्यामुळे या घसरणीपासून सावध राहणे गरजेचे आहे. जास्त उतार असलेल्या ठिकाणी आधार घ्यावा. त्यासाठी दोरखंड किंवा ट्रेकिंग पोल वापरता आला तर उत्तम.

▪️ पावसाळ्यात झाडांखाली, मोठ्या दगडांच्या फटीत साप, विंचू असे प्राणी असण्याची शक्यता असल्याने अशा ठिकाणी जास्त वेळ थांबू नका. जंगलातील काही विषारी झाडांना तसेच फुलांना हात लावू नका.

पावसाळ्यात काही ठिकाणी लेच्यांचा वावर असतो या लेच्यांपासून वाचण्यासाठी लेच प्रोटेक्शन सॉक्स किंवा सोबत मीठ ठेवावे.

▪️ हवामानाचा अंदाज घेऊनच ट्रेकिंग ला जावे. जोरदार पाऊस, विजेचा धोका असताना ट्रेक शक्यतो टाळावा. हवामानाची अचूक माहिती घेऊनच ट्रेकला निघावे.

▪️ अनोळखी ठिकाणी अनुभवी गाइड किंवा ट्रेक लीडर सोबत जाणे गरजेचे असते. GPS, नकाशा किंवा compass बरोबर ठेवावा. ट्रेकच्या ठिकाणी नवी वाट न वापरता ठरलेला रस्ताच वापरवा.

▪️ ट्रेकच्यावेळी प्रथमोपचार किट जवळ ठेवावे. बँडेज, डेटॉल, पेनकिलर, लेच/कीटकदंशासाठी औषधं सोबत असावीत.

▪️ट्रेक ला गेलेल्या ठिकाणी कचरा करू नका. प्लास्टिक सारखा कचरा न सोडता परत घेऊन या. निसर्ग स्वच्छ ठेवणं आपली जबाबदारी आहे.

▪️आपल्या शारीरिक क्षमतेनुसारच आपला ट्रेक निवडावा. आपली ताकद, सहनशक्ती आणि अनुभव यानुसार ट्रेकची निवड करा.

▪️ तलाव, धबधबा, ओढे यामध्ये अचानक पाण्याची पातळी वाढण्याचा धोका असतो, त्यामुळे त्यात उतरताना जास्त काळजी घ्यावी.

▪️महत्वाचे म्हणजे असुरक्षित ठिकाणी सेल्फी, फोटो व व्हिडीओ काढणे टाळावे. परिसरातील रेस्क्यू टीमचे संपर्क क्रमांक आपल्या सोबत ठेवावेत जेणेकरून अडचणीच्या काळात आपल्याला संपर्क करणे सोपे जाईल.

वरील सर्व काळजी घेतल्यास आपल्याला पावसाळ्यातील ट्रेकिंगचा आनंद मनमुराद घेता येईल. पावसाळी ट्रेकिंगला जाताना सोबत सीड बॉल, बिया किंवा एखादे रोप नेता आले तर नक्की न्या. ज्या ठिकाणी जाणार त्या जंगलात या बिया टाका, त्यामुळे ट्रेकिंग बरोबर एखादे झाड लावून पर्यावरणाचे संवर्धन ही आपल्याला साधता येईल. मग जाताय ना या पावसाळ्यात एखाद्या ट्रेकला!

______________________________
*संवाद मीडिया*

🧑‍💼👨‍💼🧑‍💼👨‍💼🧑‍💼👨‍💼🧑‍💼👨‍💼

*प्रवेश सुरु..प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…..*

*सावंतवाडीतील नामांकित A श्रेणी असलेले श्री पंचम खेमराज महाविद्यालय – SPK कॉलेज*

*सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे मुंबई विद्यापीठ संलग्न…..*

*श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी* (स्वायत्त)

*बेस्ट कॉलेज पुरस्कार (ग्रामीण विभाग) मुंबई विद्यापीठ ISO9001:2015*

*नॅक पुर्नमुल्यांकन ए ग्रेड ( 3.06 सी.जी.पी.ए.)*
*अग्रणी महाविदयालय मुंबई विद्यापीठ*

*शैक्षणिक वर्ष २०२५-२६*

*वरिष्ठ, पदवी व पदव्युत्तर महाविद्यालय (कला, वाणिज्य व विज्ञान) प्रवेश सुरु….*

*▪️कला शाखा🔸बी. ए. :-*
🔸 इंग्रजी 🔸मराठी 🔸हिंदी 🔸 अर्थशास्त्र 🔸 भूगोल 🔸 मानसशास्त्र,

*▪️एम. ए.*
🔹 इंग्रजी 🔹अर्थशास्त्र 🔹 हिंदी 🔹भूगोल

*▪️पीएच. डी.*
🔸भूगोल🔸 हिंदी 🔸 इंग्रजी

*▪️वाणिज्य शाखा*
* बी. कॉम.
* बी. कॉम. (बँकिंग ॲण्ड इन्शुरन्स)
* एम. कॉम. (ॲडव्हांस अकौंटंसी)

*▪️विज्ञान शाखा*
बी. एस्सी.
* रसायनशास्त्र * प्राणीशास्त्र * गणित, वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र
* कॉम्प्युटर सायन्स, आय.टी. * डेटा सायन्स आय.
आणि ए. आय.

*▪️एम. एस्सी.*
* रसायनशास्त्र * वनस्पतीशास्त्र * प्राणीशास्त्र

*▪️पीएच.डी.*
* रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र
* प्राणीशास्त्र

*संपर्क :- प्राचार्य*
▪️कला विभाग –
*डॉ. सौ. पी. जी. नाईक :* 9422374329
*डॉ. एस. एम. बुवा :* 9422810226

▪️विज्ञान विभाग –
*डॉ. जी. एस. मर्गज :* 9420209013
*डॉ. डी. बी. शिंदे :* 7066175697

▪️वाणिज्य विभाग –
*डॉ. एस. ए. देशमुख* 7875582850
*डॉ. सौ. एस. जे. जाधव:* 9922771024

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

*प्रवेश सुरु..प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…..*

*📍शैक्षणिक वर्ष : सन २०२५-२६*
*इ. ११वी / १२वी*

*📕कला शाखा*
*📕वाणिज्य शाखा*
*📕विज्ञान शाखा*

*ऑनलाईन प्रवेश नोंदणी*
*_दि. १९ मे २०२५ पासून महाविद्यालयात सुरु._*
*त्वरीत संपर्क साधा……*
*📍अकरावी कला*
श्री. एम. व्ही. भिसे – 8975196861
श्रीम. एम. एस. ठाणेकर – 8975215472

*📍अकरावी वाणिज्य*
श्रीम. पी. एम. नाईक – 9421264826
श्रीम. के. पी. लोबो – 9421237616

*📍अकरावी विज्ञान*
श्री. आर. एम. सावंत – 9657729142
श्री. ए. ए. कांबळे – 9975180635

*ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*

*♦️ महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये♦️*
*🔹संस्थानकालीन वास्तू व प्रशस्त इमारत
*🔹अ श्रेणी नॅक नामांकन प्राप्त
*🔹स्वायत्त महाविदयालय
*🔹पदव्युत्तर अभ्यासक्रम
*🔹तज्ञ मान्यताप्राप्त पी. एच. डी. मार्गदर्शक उपलब्ध
*🔹अनुभवी, तज्ञ प्राध्यापक वर्ग
*🔹 विविध विषयांसाठी संशोधन केंद्र
*🔹नवोपक्रम व नवसंशोधन साहचर्य विभाग
*🔹 कला सांस्कृतिक विभाग
*🔹 रोजगार केंद्र
*🔹 समुपदेशन केंद्र
*🔹आचार्य चाण्याक्य कौशल्य विकास केंद्र *
*🔹लोककला केंद्र
*🔹 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
*🔹 सुसज्य ग्रंथालय व अभ्यासिका
*🔹सुसज्य प्रयोगशाळा
*🔹अद्ययावत कॉम्प्युटर लॅब
*🔹लँग्वेज लॅब
*🔹 मुलींसाठी वसतीगृहाची सोय
*🔹 अद्ययावत जीम
*🔹 शुटींग रेंज
*🔹सुसज्य क्रीडा विभाग
*🔹 एन. एस. एस.
*🔹एन. सी. सी. (आर्मी व नेव्ही) मुले व मुली
*🔹 आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग-
डी. एल. एल.ई.
*🔹 करियर कट्टा
*🔹 सर्टिफिकेट कोर्स इन फोटोग्राफी
*🔹सर्टिफिकेट कोर्स इन फ्रेंच
*🔹 सर्टिफिकेट कोर्स इन ए. आय.

*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/171800
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा