You are currently viewing अर्चना घारे परब यांना कोकण विभागाच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल राष्ट्रवादीमध्ये नवचैतन्य – अमित सामंत

अर्चना घारे परब यांना कोकण विभागाच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल राष्ट्रवादीमध्ये नवचैतन्य – अमित सामंत

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन दिल्या शुभेच्छा

सावंतवाडी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुकांचा विचार करून अर्चना घारे परब यांच्याकडे कोकण विभागीय महिला अध्यक्षपदाची जबाबदारी देऊन, सिंधुदुर्गात राष्ट्रवादी मध्ये नव चैतन्य निर्माण केले आहे. असे मत जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. यावेळी सावंतवाडी शहरातील जिल्हा व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी अर्चना घारे परब यांना पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी ते म्हणाले की, अर्चना घारे परब यांना दिलेली ही मोठी जबाबदारी ते नक्कीच सार्थकी लावतील व जिल्यातील राष्ट्रवादीची ताकद दाखवून देतील असा विश्वास व्यक्त करताना, सावंतवाडी विधानसभा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून, आगामी विधानसभा निवडणूक आम्ही या ठिकाणी ताकदीने लढवणार असून, ती जिंकून पक्षाध्यक्ष शरद पवार यांना भेट देणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,माजी राज्यमंत प्रविण भोसले,आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 16 =