You are currently viewing सांडपाण्यामुळे मालवण बंदर जेटीनजीक दुर्गंधी

सांडपाण्यामुळे मालवण बंदर जेटीनजीक दुर्गंधी

 

मालवण बंदर जेटी नजीक रस्त्यावर सतत कचरा, सांडपाण्याचा प्रश्न उद्भवत आहे. येथील रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्याचा पर्यटक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिकेने याची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. बंदर जेटीनजिक रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच किल्ले सिंधुदुर्ग पाहण्यासाठी व मालवणचे सौंदर्य उपभोगण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून याबाबत नाराजी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × one =