You are currently viewing डॉ .निवृत्ती जाधव ‘ शाहू फुले ‘ आंबेडकर ‘समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

डॉ .निवृत्ती जाधव ‘ शाहू फुले ‘ आंबेडकर ‘समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

मुंबई

 

समाज न्याय व विशेष सह विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात येतो. शासनाचा सदर पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे नुकताच साजरा करण्यात आला .

त्यामध्ये डॉ . निवृत्ती जाधव यांना शाहू फुले आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले .

संजीवनी बहु . शिक्षण संस्था केळवद .गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत आहे .डॉ . निवृत्ती जाधव यांना यापूर्वीही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे .एनजीओ संस्थेच्या माध्यमातून डॉ . निवृत्ती जाधव शासनाच्या विविध योजना प्रकल्प सर्व धर्मीय जातीय सामुहिक लग्न सोहळा . आदी संस्थेच्या वतीने उपक्रम सुरू आहे .संस्थेचे पंधरा वर्षाचे सामाजिक क्षेत्रातील मौलिक कार्याचे योगदान निकष लक्षात घेऊन सदर संजीवनी संस्थेची निवड करण्यात आली .सदर पुरस्कार सोहळा नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स ( एनसीपीए ) जमशेद भाभा नाट्यगृह मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि सामाजिक न्याय मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदर सोहळा संपन्न झाला .यावेळी संजीवनी संस्थेचे कार्यकारी सदस्य मनोहर पवार यांनाही गौरविण्यात आले .महाराष्ट्र राज्यातील अनेक विविध पुरस्कारर्थी यावेळी हजर होते .डॉक्टर निवृत्ती जाधव यांना शासनाचा शाहू ‘ फुले आंबेडकर समाज भूषण गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे .हा तर ‘माझ्या मातीचा गावाचा जिल्ह्याचा सन्मान ‘असे मी समजतो . व मी माझे कार्य अखंड चालूच ठेवेन ! असे डॉक्टर निवृत्ती जाधव या वेळी म्हणाले .

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =