You are currently viewing रामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा – सावंतवाडीत तहसीलदारांना निवेदन सादर 

रामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा – सावंतवाडीत तहसीलदारांना निवेदन सादर 

हिंदू जनजागृती समितीची शासनाकडे मागणी

सावंतवाडी

देशभरात रामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर केंद्र व राज्य शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी आज तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन दिले. यावेळी हिंदुजनजागृती समितीचे जीवन केसरकर, सीताराम म्हापणकर, प्रसाद काळे, दिनेश रेडकर, उमेश परब आदी उपस्थित होते.

त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले कि, १० एप्रिलला देशभरात उत्साहात पार पडलेल्या श्रीरामनवमीच्या दिवशी अनेक राज्यांत रामनवमीनिमित्त आयोजित मिरवणुकांवर दगडफेक करण्यात आली. हिंदूंची श्रद्धा असलेल्या श्रीरामाच्या धार्मिक उत्सवांवर झालेले भीषण आक्रमण अत्यंत गंभीर आहे. श्रीरामजन्मभूमी प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावर आता कुठे श्रीराम मंदिराची पायाभरणी चालू आहे, असे असतांना धर्मांधांनी रामनवमी निमित्त काढण्यात येणार्‍या मिरवणुकांवर देशभरात आक्रमणे करून हिंदु समाजाला आणि सरकारला एक संदेश दिला आहे, असेच दिसते. मात्र मुंबईत मानखुर्द आणि मालवणी येथे रामनवमीच्या मिरवणुकीला धर्मांधांनी विरोध करत हिंदूंना मारहाण केली. गुजरातमध्ये आनंद, हिंमतनगर, माहुवा, खंभात, सकरपुरा अन् द्वारका येथे रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली. कर्नाटकमध्ये कोलार आणि मुलबागल याठिकाणीही रामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमणे करण्यात आली. छोट्याशा गोव्यातही वास्को शहरात प्रथमच रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेकीची घटना घडली. मध्य प्रदेशमधील खरगोन आणि सेंधवा, राजस्थानमधील करौली, बंगालमधील हावडा आणि झारखंड राज्यातही धर्मांध मुसलमानांकडून रामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमण करण्यात आले. देहलीतील जेएनयूमध्येही श्रीरामनवमीनिमित्त पूजेचे आयोजन केल्याने हिंसक घटना घडली. ज्या ‘जेएनयू’तमहिषासुर जयंती साजरी केलेली चालते. मात्र श्रीरामनवमी साजरी केलेली चालत नाही, हे देशाचे दुर्दैव आहे. वरील घटना या प्रसिद्धी माध्यमात छापून आल्या, प्रत्यक्षात आणखी अनेक ठिकाणी, असे प्रकार घडले असतील. दगडफेकीसह तलवारी घेऊन हिंसक आक्रमण; वाहने आणि घरे पेटवणे; सार्वजनिकसंपत्तीची हानी करणे आदी सर्व घटना गंभीर आहेत. त्यामुळे या सर्व घटनांची राष्ट्रीय स्तरावर सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईकरावी, अशी मागणी आम्ही करत आहोत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 7 =