You are currently viewing औद्योगिक वसाहतींमुळे होणाऱ्या प्रदूषणसंदर्भात बैठक घेणार – मंत्री दीपक केसरकर

औद्योगिक वसाहतींमुळे होणाऱ्या प्रदूषणसंदर्भात बैठक घेणार – मंत्री दीपक केसरकर

पुणे :

 

पुणे जिल्ह्यातील दौड तालुक्यातील कुरकुंभ येथे रासायनिक औद्योगिक वसाहतीमुळे प्रदूषण होत आहे. त्यामुळे यावर तातडीने बैठक घेण्यात येणार असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य ॲङ राहूल कुल यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, पुणे जिल्ह्यात दौड तालुक्यातील मौजे कुरकुंभ येथील महाराष्ट्र औद्योगिक वसाहत असून यामध्ये जल प्रदूषण करणारे एकूण 69 उद्योग आहेत. यापैकी 29 उद्योग हे प्रक्रिया केल्यानंतर त्यांचे सांडपाणी पुढील प्रक्रियेकरिता सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये पाठविण्यात येते. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधून कोणत्याही उद्योगामधून प्रक्रिया केलेले किंवा प्रक्रिया न केलेले औद्योगिक सांडपाणी नदी पात्रात सोडले जात नाही. कुरकुंभ औद्योगिक वसाहतींमधील 2022 मध्ये दोषी आढळून आलेलया 2 उद्योगांना उत्पादन बंदीचे आदेश आणि 10 उद्योगांना प्रस्तावित निर्देश आणि 2 उद्योगांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रदूषणामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याबाबत चौकशी करण्यात येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा