You are currently viewing १३ मे रोजी आरवली येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर

१३ मे रोजी आरवली येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर

वेंगुर्ला :

आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्र, कै.हिराबाई नारायण प्रभूझांटये नेत्र रूग्णालय व गांवधडवाडी मित्रमंडळ आरवली यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १३ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.

आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्रात होणा­या या शिबिरात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.अमित आजगांवकर, त्वचारोग तज्ज्ञ डॉ.अभिज्ञा आजगांवकर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.अश्विनी आजगांवकर, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.प्रग्या पोरवाल यांच्यासह डॉ.धृती आजगांवकर, डॉ.जयप्रकाश पेडणेकर, डॉ.विनायक सावर्डेकर, डॉ.ओंकार खांडेकर व डॉ.प्रदिप येसाजी आदी डॉक्टर उपस्थित राहून रूग्णांची तपासणी करणार आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रूग्णांची रक्त, एक्स-रे, ई.सी.जी. तपासणी मोफत केली जाईल. शिबिरास येताना रूग्णांनी आपले जुने रिपोर्टस् व औषधे बरोबर आणावीत. अधिक माहितीसाठी आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्र (०२३६६) २२७२३२ किवा ९८२३४३५५०२ यावर संफ साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा