You are currently viewing अर्जुन रावराणे विद्यालयात डॉ. निशिगंधा वाड एज्युकेशन ट्रस्ट च्या वतीने मोफत पुस्तक वाटपाचा कार्यक्रम संपन्न

अर्जुन रावराणे विद्यालयात डॉ. निशिगंधा वाड एज्युकेशन ट्रस्ट च्या वतीने मोफत पुस्तक वाटपाचा कार्यक्रम संपन्न

डॉ. निशिगंधा वाड एज्युकेशन ट्रस्ट व डॉ. विजया वाड पुरस्कृत *वाचू आनंदे* उपक्रमाअंतर्गत अर्जुन रावराणे विद्यालय, कै हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय व जयेंद्र दत्‍ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी येथे मोफत पुस्तक वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिंदे एस.बी.यांनी केले, प्रमुख पाहुण्यांचे स्वागत स्थानिक कमिटीचे अध्यक्ष श्री जयेंद्र रावराणे यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. पुनम राणे यांनी आपल्या मनोगतात पुस्तक वाचनाने आपले आयुष्य समृद्ध होते असे सांगितले या कार्यक्रमाला उपस्थित रमा शिंदे यांनी देखील मनोगत व्यक्त केले प्रशालेचे मुख्याध्यापक श्री नादकर बी.एस. विद्यमान नगरसेविका श्रद्धा रावराणे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ट्रस्ट च्या माध्यमातून शाळेच्या ग्रंथालयाला स्थानिक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. जयेंद्र रावराणे यांच्याकडे पुस्तके प्रदान करण्यात आली. त्यांच्या या उपक्रमाबद्दल स्थानिक कमिटी अध्यक्ष श्री जयेंद्र रावराणे यांनी ट्रस्ट चे आभार मानले व त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या, उपस्थित मान्यवरांचे आभार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री नादकर सर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × four =