You are currently viewing गणेश चतुर्थी सणासाठी साटेली-भेडशी बाजारपेठ सजली…

गणेश चतुर्थी सणासाठी साटेली-भेडशी बाजारपेठ सजली…

खरेदीसाठी गणेश भक्तांची लगबग वाढली..

दोडामार्ग

गणेश चतुर्थी तोंडावर आली असताना बाजारपेठेमध्ये लगबग वाढली आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे गणेश चतुर्थी सारख्यासण मोठ्या उत्सहात साजरा करता आला नाही त्यामुळे ह्या वर्षी तरी आनंदात साजरा करावा यासाठी बाजारपेठेमध्ये गर्दी होताना दिसून येत आहे. दोडामार्ग तालुक्यातील महत्वाचे समजल्या जाणाऱ्या दोडामार्ग बाजारपेठेत तसेच साटेली भेडशी बाजारपेठेत असेच चित्र असून विविध प्रकारचे हार,विद्युत रोषणाई तसेच आकर्षक मकर इत्यादी साहित्य यांची दुकाने गजबजू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

कोरोनाने हाहाकार माजवला असताना सुद्धा आता गणेश चतुर्थी सणाच्या पाश्वभूमीवर नागरिक मात्र कोरोनावर मात करुन कोणतीही भीती मनात न बाळगता शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करून बाजारपेठेत खरेदी करताना दिसत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा