You are currently viewing पंढरी वायंगणकर यांनी केली तोंडवली स्वाभीमान ग्रामसंघाला २०० किलो हळद वाटप

पंढरी वायंगणकर यांनी केली तोंडवली स्वाभीमान ग्रामसंघाला २०० किलो हळद वाटप

नांदगाव

पंढरी वायंगणकर सामाजिक कार्यकर्ते तसेच भाजप सरचिटणीस यांनी स्वाभीमान ग्रामसंघ तोडवली मधील महिला समुहानाना मोफत २०० किलो हळद वाटप केली आहे . त्याच प्रमाणे आपल्या महिलांचे सक्षमीकरण कसे होऊ शकते तसेच महिला समुहामुळे आपल्या गावातील वाडीवाडी मधील असणारे सामाजिक प्रश्न कसे सोडवता येतील याची चांगली माहिती दिली . तसेच विधवा महिलांसाठी पिढ्यानपिढ्या चालू असणारे अनिष्ठ रूढी परंपरां आणि चालीरीती बंद करून एका नवीन पर्वाला आपण सुरुवात करू शकतो .आणि विधवा महिला बाबत समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन बदलु शकतो. असेही त्यांनी सांगितले . महिलांनी निरनिराळ्या लहान मोठ्या उदयोगानेआपल्या सक्षमीकरणाची सुरुवात स्वतः पासुनच केली पाहीजे. आणि त्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य आमच्या मार्फत केले जाईल . असे ही त्यांनी सांगितले . या कार्यक्रमात सरपंच मनाली गुरव . उपसरपंच अशोक बोभाटे असलदे उपसरपंच संतोष परब ,तंटामुक्तीचे अध्यक्ष विलास कांडर ,प्रल्हाद कुडतरकर ,अनंत सांळुके, सुभाष बोभाटे, मयुरी बोभाटे ,वैशाली सदडेकर ,वैदेही बोभाटे, प्रगती मिराशी, साक्षी सांळुके ,शिल्पा मत्तलवार ,ज्योती भाट आदी ग्रामसंघच्या सर्व महिला उपस्थित होत्या .

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + 14 =