You are currently viewing सावंतवाडी नगरपालिकेला आमदार निधीतून इलेक्ट्रिक कचरागाडी खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता

सावंतवाडी नगरपालिकेला आमदार निधीतून इलेक्ट्रिक कचरागाडी खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता

सहा गाड्या करणार खरेदी: १८ लाख ६० हजाराचा निधी उपलब्ध

सावंतवाडी

सावंतवाडी शहर प्रदूषण मुक्त राहण्यासाठी सावंतवाडी पालिकेने पावले उचलली आहेत. सावंतवाडी पालिका आता कचरा गोळा करण्यासाठी कचरा वाहतूक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करणार आहेत . सावंतवाडी नगरपालिकेने आमदार निधीतून इलेक्ट्रिक कचरागाडी खरेदी करण्यासाठी पाठवलेल्या अर्जाला आज प्रशासकीय मान्यता मिळाली असून , त्यासाठी ६ गाड्या खरेदी करण्यासाठी १८. ६० लाख रुपये निधी मिळणार असल्याची माहिती नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी पांडुरंग नाटेकर , रसिका नाडकर्णी यांनी दिली आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा