You are currently viewing कोरोना रोखण्यासाठी प्राणजीवन सहयोग संस्थेतर्फे सॅनिटायझर फवारणी

कोरोना रोखण्यासाठी प्राणजीवन सहयोग संस्थेतर्फे सॅनिटायझर फवारणी

रेडी जि.प. विभागात सदस्य प्रितेश राऊळ यांच्या हस्ते शुभारंभ

वेंगुर्ले
कोरोना व्हायरस या पार्श्वभूमीवर प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल याच्या उपक्रमाच्या माध्यमातून या संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या सहकार्यातून या संस्थेचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष अंकित आजगांवकर व वेंगुर्ला तालुका अध्यक्ष गितेश शेणई यांच्या सहकार्याने रेडी जि.प.विभागात सदस्य प्रितेश राऊळ यांच्या हस्ते फवारणीचा शुभारंभ करण्यात आला.

या उपक्रमात संस्थेचे सहकारी विनायक प्रभू झांटये,अक्षय कसालकर, विश्राम कोचरेकर, श्रीराम जाधव, राजन गावडे, सीताराम नाईक, मोहन गवस, यांनी रेडी जि.प.विभागा अंतर्गत शिरोडा, रेडी, आरवली या गावामध्ये कंटेनमेंट झोन असलेल्या ठिकाणी सॅनिटायझर फवारणी करण्याचा शुभारंभ केला. या वेळी शिरोडा ग्रामपंचायत सरपंच मनोज उगवेकर, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य राहुल गावडे, दिलीप गावडे, शिरोडा ग्रामविकास अधिकारी सुनिल चव्हाण, शिरोडा तलाठी फिरोज खान, आशा सेविका सौ.गीता धुरी उपस्थित होते. वरील संस्थेच्या पदाधिकारी व सहकारी यांच्या कडून शिरोडा ग्रामपंचायत कर्मचारी सिध्देश गावडे,गजानन शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बागायतवाडी, आंब्याची भाटी, खासबागवाडी, देऊळवाडी, डोंगरीवाडी येथील कंटेनमेंट झोन मध्ये जंतूचानाश होण्यासाठी सॅनिटायझरची फवारणी केली. खासबागवाडी येथील कंटेनमेंट झोन ठिकाणी श्रीकृष्ण धानजी यांच्या मार्गदर्शनाखाली सॅनिटायझरची फवारणी केली.

शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांच्या मागणीनुसार शिरोडा बाजारपेठ येथे सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली या वेळी संस्थेचे सहकारी लक्ष्मीकांत कर्पे,श्रीकृष्ण धानजी, विदयाधर धानजी यांच्या मार्गदर्शनाखाली सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. त्यानंतर रेडी व आरवली येथील कंटेनमेंट झोन मध्ये फवारणी करण्यासाठी वरील संस्थेची टिम रवाना झाली व तेथील फवारणी पूर्ण केली या संस्थेचे पदाधिकारी व सहकारी आपला जीव धोक्यात घालून कंटेनमेंट झोन मध्ये फवारणी करत आहेत, हे आजचे कोरोना योद्धा आहे असे म्हणून शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी त्यांचा शब्दसुमनाने गौरव केला. त्याच बरोबर आपल्या विनंतीचा मान राखून रेडी जि.प.विभागातील सर्व कंटेनमेंट झोन व सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर फवारणी केल्याबद्दल मनोज उगवेकर यांनी संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी,स्वयंसेवक यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 6 =