You are currently viewing ….अन्यथा, “जेवण वाढा” आंदोलन करु : बनी नाडकर्णी

….अन्यथा, “जेवण वाढा” आंदोलन करु : बनी नाडकर्णी

कुडाळ

एसटी कर्मचा-यांना त्यांचा 3 महिन्यांचा पगार दिला गेला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना सर्व एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबा सोबत स्थानिक आमदारांच्या घरा समोर जेवण वाढा आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसे नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी दिला आहे.

कोरोना सारख्या महामारीच्या काळात आपला जीव मुठीत घेऊन सतेज सेवा बजावणाऱ्या आपल्या एस टी कर्मचाऱ्यांना सतत 3 महिने पगारासाठी भीक मागावी लागत आहे. वारंवार या संदर्भात पत्रव्यवहार करूनही एसटी कर्मचा-यांसाठी कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा मंत्री त्याची दखल घेत नसल्यामुळे आता कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामूळे मनसे नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना सर्व एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना सोबत रस्त्यावर उतरून स्थानिक आमदारांच्या घरा समोर जेवण वाढा आंदोलन करणार असा इशारा देत एसटी कर्मचा-यांचा लवकरात लवकर पगार द्या अशी मागणी मनसे नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा