You are currently viewing सावंतवाडी मोती तलावात अज्ञाताचा मृतदेह

सावंतवाडी मोती तलावात अज्ञाताचा मृतदेह

सावंतवाडी :

सावंतवाडीच्या मोती तलावात आज सकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी फिरणाऱ्या नागरिकांना कुणीतरी बुडालेली व्यक्ती पाण्यावर तरंगताना आढळून आली. त्याबाबतची खबर तात्काळ सावंतवाडी पोलिसांना देण्यात आली.

सावंतवाडी नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहानिशा करून सदरचा मृतदेह सावंतवाडी पोलिसांनी पाण्यातून बाहेर काढला. मयत व्यक्ती 40 ते 45 वयाची असून मृतदेहाची ओळख पटलेली नाही. काहीच दिवसांपूर्वी सावंतवाडीच्या मोती तलावात एका सतरा वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती. त्यानंतर अवघ्या दहा दिवसात हा दुसरा मृतदेह तलावात आढळून आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा