You are currently viewing वीज कंत्राटी कामगार संघांचे “सरकार जगाव” अभियान

वीज कंत्राटी कामगार संघांचे “सरकार जगाव” अभियान

वीज कंत्राटी कामगार संघांचे “सरकार जगाव” अभियान

कुडाळ

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची केंद्रीय कार्यकारणी मीटिंग शनिवार रविवार 25 व 26 मे 2024 रोजी वासुदेवानंद हॉल कुडाळ सिंधुदुर्ग येथे संपन्न झाली.

भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सचिव हरी चव्हाण यांनी दीप प्रज्वलन केले. विधानसभेपुर्वी संघर्षासाठी कामगारांनी तयारी सुरू करावी. शासन कामगारांसाठी असते, कंत्राटी पद्धत बंदची मागणी रास्त असल्याचे ते म्हणाले.अनेक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव , जिल्हा संघटन मंत्री व जिल्हा कोषाध्यक्ष उपस्थित होते.

कृती समितीच्या केंद्र स्थानी कंत्राटी कामगार असावा त्यात राजकारण असता कामा नये. वीज उद्योगांनातील कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहीत शाश्वत रोजगार, सामाजिक सुरक्षा व लिविंग वेजेस मिळावे भरती प्रकीये मध्ये वयात सवलत आरक्षण मिळावे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री मा ना देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासना नुसार निर्णयाची अंमलबजावणी करावी.असे महामंत्री सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केले

ई.एस.आय सी , पी एफ व वीज कंपनी कार्यालयात असलेल्या प्रलंबित तक्रारी बाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जुलै मध्ये “सरकार जगाव” अभियान राबवून प्रत्येक जिल्ह्यात कंत्राटीबकामगार मेळावे घेऊन संघटन मजबूत करण्याचे आवाहन संघटन मंत्री उमेश आनेराव यांनी केले.

मा.ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सूचना दिल्या नंतर देखील महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक वीज कंत्राटी कांमगारांच्या समस्यां सोडवण्यासाठी 5 जून पूर्वी कंत्राटी कामगार संघा सोबत मीटिंग न घेतल्यास वीज कंपनीच्या वर्धापनदिना दिवशी 6 जून रोजी राज्यभरातील कंत्राटी कामगार काळ्या फिती लावून प्रशासनाचा निषेध व्यक्त करतील अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात यांनी दिली

कार्यक्रमाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आनंद लाड यांनी केले तर सूत्र संचलन राहुल बोडके यांनी केले.

*संवाद मीडिया*

*त्वरा करा… त्वरा करा…..*🏬

*काही मोजकेच फ्लॅट शिल्लक*🏬

*_🏬फक्त चौदा लाखात सावंतवाडी-भटवाडी येथे फ्लॅट…!🏠_*

*🏬नक्षत्र अपार्टमेंट🏠*
*🏠सावंतवाडी🏬*

*ऐतिहासीक भटवाडी तळीच्या शेजारी🌴 दत्त आणि विठ्ठल मंदीर🛕 समोर बसस्थानकापासून १ किलोमीटरच्या 🚍 आत रेडी पझेशन👍 आणि सर्व परवानग्या📃 सहीत फ्लॅट उपलब्ध…!*

*⛳टीप:-* *आंबोली-सावंतवाडी रोड टच, उपरलकर देवस्थानाच्या पुढे, ५ गुंठे प्लॉट विकणे आहे…!*

*♻️प्रोप्रा. पनवेलकर डेव्हलपर्स♻️*
*सावंतवाडी*

*📲संपर्क:-*
*9422436585*
*9766048585*

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/135837/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा