You are currently viewing तळवडेतील मिरेस्तीवाडी येथे आढळली सहा फूट मगर

तळवडेतील मिरेस्तीवाडी येथे आढळली सहा फूट मगर

सावंतवाडी :

 

सावंतवाडीत तळवडे गावातील मिरेस्तीवाडी येथे शेतकरी रमाकांत कुलकर्णी यांच्या घरच्या परिसरात ६ फूट मगर आढळून आली. काल रात्री ही घटना घडली. सावंतवाडी वन विभागाच्या कर्मचारी यांनी मगरीच यशस्वी सुटका करत तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तळवडे येथे भर वस्तीत मगर आढळून असल्याचे वन विभागाला कळाले त्या नुसार सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांचे नेतृत्वाखाली वन विभागाचे जलद बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. अंदाजे ६ फूट लांबीची मगर श्री. कुलकर्णी यांचे घराच्या परिसरात असल्याचे दिसून आले. ही मगर श्री. कुलकर्णी यांचे घरच्या जवळ असलेल्या होडावडा नदीतून आली असण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

वन विभागाचे कर्मचारी श्री.रामचंद्र रेडकर यांनी तळवडे ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या शिताफीने मगरीला यशस्वीरित्या पकडले. त्यानंतर ती मगर नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यासाठी सुदृढ असल्याने तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. ह्या मोहीमेत उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. एस. नवकिशोर रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल विजय पांचाळ, वनरक्षक रमेश पाटील, प्रकाश रानगिरे, वनमजुर रामचंद्र रेडकर, तळवडे येथील रहिवासी श्री.बाळा जाधव आणि इतर ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा