You are currently viewing फोंडाघाट येथे आकेशियाच्या झाडाची अवैध वाहतूक करणारा ट्रक ताब्यात

फोंडाघाट येथे आकेशियाच्या झाडाची अवैध वाहतूक करणारा ट्रक ताब्यात

सोमवारी रात्री फोंडाघाट- दाजीपूर रस्त्यावर फोंडाघाट येथे आकेशियाच्या झाडाची अवैध वाहतूक करणारा ट्रक कणकवली वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतला. ट्रक व लाकूड मिळून 7 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रशांत नामदेव राणे (रा. भैरीबांबर ता.राधानगरी) व अमर बळवंत शिंदे (रा. ठिपकुर्ली ता. राधानगरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपवनसंरक्षक नारनवर सहाय्यक वनसंरक्षक जळगावकर, वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विनापरवाना होत असलेल्या अकेशिया लाकडाच्या वाहतुकीवर ही कारवाई करण्यात आली. वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनकिकर, वनपाल अनिल जाधव, वनरक्षक श्री. शेगावे, श्री. सुतार, वनरक्षक श्री. मनेर, वनरक्षक अनिल राख हे रात्रीची गस्त घालत असताना ट्रक नंबर एमएच 10 झेड 0631 मधून आकेशियाच्या लाकडाची वाहतूक होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या पथकाने रात्रीच्या गस्तीच्या वेळी सदरचा ट्रक जप्त करून आतील लाकडासह वनविभागाच्या फोंडाघाट येथील विक्री आगारात आणण्यात आला. यावेळी 7 लाख रुपये किमतीचा टेम्पो 65 हजार रुपये किमतीचे लाकूड जप्त करण्यात आले. ही कारवाई क्षेत्रपाल राजेंद्र घुनकीकर व वनपाल अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. अधिक तपास अनिल जाधव करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा