You are currently viewing महामार्गावर बस व दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार पती- पत्नी ठार

महामार्गावर बस व दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार पती- पत्नी ठार

कणकवली
मुंबई – गोवा महामार्गावर कासार्डे जाभूळवडी येथे खाजगी बस व दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती – पत्नी जागीच ठार झाल्या. हा अपघात रविवारी रात्री १० सुमारास झाला. अंकुश सोनू घाडी व राजश्री अंकुश घाडी रा. चांदिशी – तळेबाजार ता. देवगड अशी त्यांची नावं आहेत.

खाजगी बस गोव्याहून मुंबईला जात होती तर घाडी दांपत्य दुचाकीने कासार्डे येथील घरि जात होते.भरधाव वेगात जाणाऱ्या बसने दुचाकीला मागून धडक दिली ही धडक एवढी जबरदस्त होती दुचाकीवरील दोघेही ठार झाले .
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन हुंदलेकर महामार्ग पोलीस निरीक्षक अरुण जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा