You are currently viewing जिल्ह्यामध्ये 4 मार्च रोजी महारोजगार मेळावा

जिल्ह्यामध्ये 4 मार्च रोजी महारोजगार मेळावा

जिल्ह्यामध्ये 4 मार्च रोजी महारोजगार मेळावा

सिंधुदुर्गनगरी

कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने  जिल्ह्यामध्ये कणकवली कॉलेज कणकवली येथे  दि. 4 मार्च रोजी सकाळी 10 वाजता महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास, राजगार व उद्योजकताचे प्र. सहायक आयुक्त ग.पा. चिमणकर यांनी दिली आहे.

   या महारोजगार मेळव्यासाठी नोंदणी कौशल्य रोजगार, उद्योजकता नाविन्यता विभागाच्याwww.rojgar.mahaswayam.gov.in  या पोर्टलवर करावी. या रोजगार मेळाव्यामध्ये विविध औद्योगिक आस्थापना व उद्योजक सहभागी होत असल्याने जिल्यातील नोकरीइच्छुक सर्व उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे. रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीकरिता आपला बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतीसह प्रत्यक्ष उपस्थित रहावे.

उद्योजकांनी  आपल्याकडील उपलब्ध रिक्तपदे पोर्टलवर नमो महारोजगार मेळाव्यामध्ये अधिसूचित करावीत. रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास उद्योजक तसेच उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग येथे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी. रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्री. चिमणकर  यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:- ०२३६२-२२८८३५, ईमेल आयडी:- sindhudurgrojgar@gmail.com संपर्क करावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा