You are currently viewing कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा; कृषी विभागाचे आवाहन

कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा; कृषी विभागाचे आवाहन

सिंधुदुर्ग

शेतकरी बांधवांसाठी सन २०२०-२१ या वर्षाची कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजना सुरू झाली आहे. ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलीत औजारे जसे रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, हायड्रॉलिक पलटी नांगर, कापणी यंत्र, ऊस पाचट कुटी यंत्र  फवारणी यंत्र, तशेच पॉवर टिलर, वीडर, रिपर कापणी यंत्र, खरेदी करायचे असतील अशा शेतकरी बांधवांनी महाराष्ट्र शासनाच्या mahadbtmahait.gov.in पोर्टल वर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत. ७/११२ व ८ अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, ट्रॅक्टर आरसी बुक, जातीचा दाखला असल्यास, मोबाईल ओटीपी इत्यादी पेपर आवश्यक आहेत.
यासंदर्भात महत्वाची टीप देण्यात आली आहे, ती अशी कि, ज्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे यापूर्वी अर्ज केले आहेत ते सर्व अर्ज रद्द करण्यात आलेले आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी नव्याने ऑनलाइन पोर्टल वर अर्ज करावे. लाभार्थी निवड लकी ड्रॉ /सोडत पद्धतीने करण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनी ऑनलाइन पोर्टल वर अर्ज भरण्यासाठी आपल्या गावातील सी.एस.सी सेंटर ला भेट देऊन कोरोना या महामारीमुळे सोशल डिस्कशन चे नियम पाळून अर्ज भरावेत. शेतकरी बांधवांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्ज भरल्याची पावती जपून ठेवावी असे आवाहन कृषि विभाग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + 8 =