You are currently viewing भाजपा स्थापना दिनानिमित्त दिवंगत स्वातंत्र्यसैनिकाला अभिवादन; पत्नीचा केला सत्कार

भाजपा स्थापना दिनानिमित्त दिवंगत स्वातंत्र्यसैनिकाला अभिवादन; पत्नीचा केला सत्कार

वैभववाडी :

 

बुधवारी भाजपाचा स्थापना दिन भाजपा कार्यकर्त्यांकडून देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. वैभववाडीमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांनी हा दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. भाजपा स्थापना दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक कै. शंकर कांबळे यांच्या नाधवडे येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. तसेच दिवंगत कांबळे यांच्या पत्नी श्रीमती यशोदा शंकर कांबळे (९०) यांचा भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

वैभववाडी तालुक्यात भाजपा स्थापना दिन ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. गावागावात बुथ अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा झेंडा फडकावत स्थापनादिन साजरा केला. नाधवडे गावचे सुपुत्र शंकर कांबळे हे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. नाधवडे नवलादेवीवाडी येथील श्री. कांबळे यांच्या घरी भाजपा पदाधिकारी यांनी भेट दिली. स्वातंत्र्य सैनिक शंकर कांबळे यांना यावेळी अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या पत्नी यशोदा शंकर कांबळे यांचा भाजपाने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, माजी सभापती अक्षता डाफळे, वैभववाडी नगराध्यक्षा नेहा माईणकर, माजी सभापती बाप्पी मांजरेकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर दळवी, प्रकाश पाटील, प्रदीप नारकर, सूर्यकांत कांबळे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 5 =