डेगवे गावात सात दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप…

डेगवे गावात सात दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप…

सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावात “गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या”…अशा जयघोषासह आपल्या देशावर,महाराष्ट्र राज्यावर पडलेले करोना प्रार्दुभावाचे संकट लवकर दुर कर असे साकडे गणरायाच्या चरणी घालत करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आज डेगवे गावात व गावा तील आंबेखणवाडीतील वाडीच्या मध्यवर्ती असलेल्या गणेश घाटावर व गावातील अन्य ठिकाणच्या वाडी वस्तीवरील गणेश घाटावर भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.

विसर्जनाच्या वेळी लहान,थोर मंडळी उपस्थित होती.विसर्जनाच्या वेळी गणेश भक्तांच्या संखेवर असणाऱ्या मर्यादेचे आणि शासन, प्रशासन, ग्रामपंचायतीच्या सुचनांचे ग्रामस्थांनी पालन करीत भक्तीपूर्ण वातावरणात आपल्या लाडक्या गणरायाच्या चरणीं लिन होऊन “गणपती गेले गावाला…चैन पडेना आम्हाला… अशा जयघोषाने लहान मुले भावूक होऊन निरोप दिला.यंदा बरीचशी चाकरमानी मंडळी आपल्या गावी करोना प्रादुर्भावामुळे येऊ शकली नसल्याने थोडा निरुसाह असला तरी गावातील आपले बांधव,व गांव सुरक्षित राहिले पाहिजे याच्या जाणीवेने ते आले नसल्याचे काही ग्रामस्थ त्यांना धन्यवाद देत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा