You are currently viewing तहसिलदार राजाराम म्हात्रे यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली

तहसिलदार राजाराम म्हात्रे यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली

शीतल रसाळ सावंतवाडीच्या नवीन तहसीलदार

सावंतवाडी
सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली झाली असून त्यांच्या जागी अमरावती महसूल विभागातील खामगाव तहसीलदार पदी कार्यरत असलेल्या शीतल रसाळ यांची सावंतवाडी तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सावंतवाडी तहसीलदार म्हणून काम करत असताना तळागाळातील लोकांना चांगली सेवा दिली. त्याचबरोबर त्यांच्या समस्या तात्काळ कशा सोडवता येतील यासाठी प्रयत्न केले. कोरोना काळात त्यांनी केलेले काम आदर्शवत आहे. तसेच नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत त्यांनी अतिशय कौतुकास्पद असे काम केले आहे. मात्र म्हात्रे यांची मुदतपूर्व बदली झाल्याने सावंतवाडी तालुक्यातील नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 5 =