निगडी गावठाण –
आषाढी वारीनिमित्त पोलीस मित्र नागरिक दक्षता संघ यांच्या वतीने हनुमान मंदिर परिसर, निगडी गावठाण येथे गुरुवार,दिनांक १९ जून २०२५ रोजी वारकऱ्यांची मोफत आरोग्यतपासणी आणि औषध वाटप करण्यात आले.
याप्रसंगी पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष सुमन पवळे, पोलीस मित्र नागरिक दक्षता संघाचे अध्यक्ष ॲड. रमेश उंबरगे, संस्थापक अध्यक्ष मनोहर दिवाण, महालिंग शेट्टी, शिवाजी शिर्के, राम सपाटे, रोहिदास वालगुडे, गौरी उत्तुरे, महेश स्वामी, ओंकार पवळे, नंदाराम भागवत, नंदकिशोर जगदाळे, मधुराज पवळे, साहित्यिक प्रकाश चव्हाण, राजेंद्र घावटे, अण्णा जोगदंड, तानाजी एकोंडे, सुरेश कंक आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. प्राची इंगवले, डॉ. सौरभ शिराळकर, डॉ. अभिनंदन कुमठेकर यांनी वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली. कुमार हेरंब कुमठेकर याने औषध वाटप केले.
सौ.सुप्रिया कुमठेकर, प्रकाश गावडे, ओंकार पोळे, बाळासाहेब गाडे, भीमाशंकर उमरजे, दत्तात्रय दुवा, विजय नाटक, भरत मांडेकर, शिवाजी पवार यांनी या उपक्रमास सहकार्य केले.