You are currently viewing सावंतवाडीत भंडारी समाज मंडळातर्फे १५ एप्रिलला वधुवर मेळावा

सावंतवाडीत भंडारी समाज मंडळातर्फे १५ एप्रिलला वधुवर मेळावा

सावंतवाडी

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने भव्य वधू – वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार १५ एप्रिल रोजी येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या नवरंग कलामंच हॉल सावंतवाडी येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत हा मेळवा होणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे अशाप्रकारचे मेळाव्याचे आयोजन करता आले नव्हते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यसह गोवा बेळगाव, कोल्हापूर, पुणे, मुंबई व रत्नागिरीतून उत्सुर्त प्रतिसाद मिळत आहे.
या मेळाव्याच्या नियोजनासाठी वेगवेगळ्या समित्यांची स्थापना व समिती प्रमुखांची निवड करण्यात आली. यात प्रसिद्धी कमिटी -प्रवीण मांजरेकर आणि संजय पिळणकर, नोंदणी कमिटी -अरविंद वराडकर, अल्पोपहार कमिटी -प्रसाद अरविंदेकर, बैठक व्यवस्था हनुमंत पेडणेकर, स्वागत कमिटी – जगदीश मांजरेकर, ज़िल्हा दौरा कमिटी – जगदीश मांजरेकर, प्रा. दिलीप गोडकर, गुरुनाथ पेडणेकर, दिलीप पेडणेकर यांसह या मेळाव्याची संपूर्ण जबाबदारी मळगांवकर यांना देण्यात आली आहे.
रविवारी ३ एप्रिल रोजी मंडळाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, कार्याध्यक्ष प्रा.दिलीप गोडकर, उपाध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर, सचिव दिलीप पेडणेकर यांनी ज़िल्हा दौरा केला. त्यावेळी जिल्हा भंडारी संघ अध्यक्ष रमण वायंगणकर , वेंगुर्ला भंडारी मंडळाचे पदाधिकारी ॲड. शाम गोडकर, विकास वैद्य, सुरेश बोवलेकर, रमेश नार्वेकर, कुडाळ भंडारी मंडळाचे अध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर, राजू गावंडे , मालवण कट्टाचे मामा माडये, मालवण भंडारी मंडळाचे अध्यक्ष रवी तळाशिलकर , मिठबावकर हडकर, कळंगुटकर, आचरा मंडळ बाळू वस्त, शेखर कांबळी, देवगड भंडारी मंडळाचे मांजरेकर, ज़िल्हा भंडारी संघ कार्याध्यक्ष हेमंत कळंगुटकर, कणकवलीचे लक्ष्मीकांत मुण्डये, निलेश गोवेकर, मनोहर पालयेकर, चोडणकर यांच्या भेटी घेण्यात आल्या.
अधिक माहितीसाठी भंडारी बांधवानी खालील वेंगुर्ला – रमण वायंगणकर 9422632990, रमेश नार्वेकर 9423301228, कुडाळ – गजानन वेंगुर्लेकर -9422633183, मालवण कट्टा – मामा माडये, -9423512070, मालवण – रवींद्र तळाशिलकर -7045379282, देवगड – हेमंत कळंगुटकर -9423513647आणि कणकवली लक्ष्मीकांत मुण्डये 9422853952 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + 14 =