You are currently viewing तळेबाजार वाघोटण रस्त्याचे आ. नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन

तळेबाजार वाघोटण रस्त्याचे आ. नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन

देवगड :

 

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते देवगड राष्ट्रीय महामार्ग १७७ वाघोटन – वानिवडे – गडीताम्हाणे – तळेबाजार – वरेरी रस्ता खडीकरण व डांबरीकरण भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. तळेबाजार होऊन पळसगाव ला जाण्यासाठी हा अत्यंत जवळचा मार्ग आहे या रस्त्यासाठी चार कोटी रुपये मंजूर झाले असून आमदार नितेश राणे यांनी हे विकास काम मंजूर करून दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केली आहे

यावेळी त्यांच्यासोबत भाजप जिल्हा कार्यकरणी सदस्य संदीप साटम, तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर, तळेबाजार सरपंच पंकज दुखंडे, बापर्डे सरपंच संजय लाड ,माजी पंचायत समिती सदस्य श्री. अजित कांबळे, भाजप पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते, व ग्रामस्थ उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा