You are currently viewing जि.प.पू.प्रा.शाळा उभादांडा नवाबागमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात साजरा.

जि.प.पू.प्रा.शाळा उभादांडा नवाबागमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात साजरा.

जि.प.पू.प्रा.शाळा उभादांडा नवाबाग ता.वेंगुर्ले येथे विद्यार्थी,पालक व शिक्षकांनी मिळून शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात साजरा केला.
कोरोनामुळे अंगणवाडीत मुले येऊ शकली नाहीत .या मुलांचे शै. नुकसान भरून काढण्यासाठी शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.तन्वी रेडकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.शा.व्य.समिती अध्यक्ष श्री. अनंत केळुसकर,उपाध्यक्ष श्री.दत्ताराम कोळंबकर, उपसरपंच श्री.गणपत केळूसकर यांच्या उपस्थितित दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून मेळाव्याची सुरवात केली.
नावाबाग वाडीत ढोल-ताशा वाजवत व घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात आली.मुलांना नौकेत बसण्याचा आनंद देण्यात आला.त्यानंतर मुला-मुलींचे नृत्य घेण्यात आले.पहिलीत प्रवेश करणाऱ्या मुलांना 7 टेबले मांडून विविध कृती घेण्यात आल्या.मुले अतिशय आनंदाने प्रत्येक कृतीत सहभागी होत होती.यावेळी सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.
या मेळाव्याला स्वयंसेवक म्हणून दाक्षायणी आरावंदेकर,दिया सारंग व निशा तारी यांनी कामकाज पाहिले.शिक्षक सौ.प्राजक्ता आपटे,श्री.रामा पोळजी, मारुती गुडुळकर, अंगणवाडी सेविका श्रीम.आरावंदेकर,मदतनीस श्रीम.बागायतकर यांनी मेळाव्यासाठी मेहनत घेतली.यावेळी पालक जितेंद्र खोबरेकर,सुभाष तांडेल,शशिकांत कुबल,अक्षरा गोकरणकर,वैष्णवी केळूसकर,अश्विनी केळूसकर,गिरप,मोर्जे, जाधव इ.उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा