You are currently viewing पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या दिनांक 17 एप्रिल 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

            शनिवार दिनांक 17 एप्रिल 2021 रोजी सकाळी 7.45 वा. मुंबई – मडगांव फेस्टीवल स्पेशल एक्सप्रेसने सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, ओरोस – सिंधुदुर्गकडे प्रयाण, सकाळी 8.15 वा. शासकीय विश्रामगृह, ओरोस -सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. सकाळी 11.30 वा. उपविभागीय अधिकारी, कणकवली, तहसिलदार कणकवली, गटविकास अधिकारी, कणकवली, पोलीस निरीक्षक कणकवली, मुख्याधिकारी, कणकवली, तालुका वैद्यकीय अधिकारी व संबंधित वैद्यकीय अधिकारी, (वैभववाडी व देवगड तालुक्यातील स्थानिक आमदार, पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष तसेच संबंधित अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे) यांच्या समवेत तहसिलदार कार्यालय, कणकवली येथे कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर देवगड, वैभववाडी, कणकवली तालुका सद्य:स्थिती आढावा बैठक, दुपारी 1.00 वा. तहसिलदार कार्यालय, कणकवली येथे पत्रकार परिषद, दुपारी 2.00 वा. कणकवली येथून मोटारीने कुडाळकडे प्रयाण, दुपारी 2.45 वा. तहसिलदार कार्यालय, कुडाळ येथे उपविभागीय अधिकारी, कुडाळ, गटविकास अधिकारी – कुडाळ, पोलीस निरीक्षक- कुडाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी व संबंधित वैद्यकीय अधिकारी ( मालवण तालुक्यातील स्थानिक आमदार, पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष तसेच संबंधित अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे) यांच्या समवेत कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कुडाळ, मालवण तालुका सद्य:स्थिती आढावा बैठक, दुपारी 4.00 वा. तहसिलदार कार्यालय, कुडाळ येथे पत्रकार परिषद, दुपारी 4.30 वा. तहसिलदार कार्यालय, कुडाळ येथे सरपंच संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा, सायं. 5.00 वा. कुडाळ येथून मोटारीने वेंगुर्ला कडे प्रयाण, सायं. 5.30 वा. वेंगुर्ला येथे आगमन व नगरपरिषद वेंगुर्ला येथे उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी, तहसिलदार – वेंगुर्ला, गटविकास अधिकारी – वेंगुर्ला, पोलीस निरिक्षक – वेंगुर्ला, मुख्याधिकारी – वेंगुर्ला, तालुका वैद्यकीय अधिकारी व संबंधित वैद्यकीय अधिकारी (सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील स्थानिक आमदार, पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष तसेच संबंधित अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे) यांच्या समवेत कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुका सद्यस्थिती आढावा बैठक, सायं. 6.30 वा. नगरपरिषद वेंगुर्ला येथे पत्रकार परिषद, रात्री 7.00 नंतर वेंगुर्ला येथे राखीव.

            रविवार दि. 18 एप्रिल 2021 रोजी सकाळी 10.45 वा. वेंगुर्ला येथून मोटारीने ओरोस – सिंधुदुर्गकडे प्रयाण, सकाळी 11.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व इतर संबंधित अधिकारी ( जिल्हा परिषद अध्यक्ष व आरोग्य सभापती दूरदृष्य प्रणालीद्वारे) यांच्या समवेत जिल्ह्यातील कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना व लसीकरणाबाबत आढावा. तसेच कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध संदर्भात आढावा बैठक, दुपारी 1.00 वा. दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषद, दुपारी 2.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथून मोटारीने राजापूर कडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 8 =