You are currently viewing दिव्यांग बांधवांनी अपंगत्वाचा बाऊ न करता रोजगाराकडे वळावे : डॉ.प्रसाद देवधर

दिव्यांग बांधवांनी अपंगत्वाचा बाऊ न करता रोजगाराकडे वळावे : डॉ.प्रसाद देवधर

वेंगुर्ले

दिव्यांग बांधवांनी आपापसातील विश्वास, संवेदना जपाव्यात. अपंगात्वाचा बाऊ न करता शासनाकडून मिळणाऱया पैशाचा विनियोग रोजगारासाठी करावा. भगिरथ प्रतिष्ठानतर्फे जिल्हयातील पंचवीस दिव्यांग बांधवाना कुकुट पालनाचे दोन दिवसाचे प्रशिक्षण मोफत देण्यात येईल असे प्रतिपादन भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी वेंगुर्ले येथे केले.
भाजपा दिव्यांग आघाडी तर्फे शुक्रवारी जागतिक अपंग दिनानिमीत्त येथील साई मंगल कार्यालयात दिव्यांग बांधवांचा जिल्हास्तरीय मेळावा घेण्यात आला.

देवधर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास वेंगुर्ले न. प. चे नगराध्यक्ष दिलिप गिरप, भाजपा प्रदेश कार्यालयीन सहसचिव शरद चव्हाण, भाजपा जिल्हा सरचिटणिस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. जी. जी. टाककर, नगरसेवक प्रशांत आपटे, नगरसेविका श्रेया मयेकर , नगरसेविका साक्षी पेडणेकर, माहीला तालुकाध्यक्षा स्मिता दामले , भाजपा दिव्यांग आधाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे, सहसंयोजक शामसुंदर लोट , साईप्रसाद नाईक, अॅड . सुषमा प्रभू खानेलकर, वजराट सरपंच महेश राणे, उप सरपंच परब,मच्छिमार सेलचे दादा केळुसकर, दिव्यांग आघाडी वेंगुर्ले तालुका संयोजक भूषण तुळसकर , साहस प्रतिष्ठानच्या रुपाली पाटील , उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , किसान मोर्चा जि.सरचिटणीस बाळू प्रभू , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , रविंद्र शिरसाठ , वसंत तांडेल व शेखर काणेकर उपस्थित होते.

यावेळी भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल, साहस प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रुपाली पाटील या दिव्यांग बांधवासाठी चांगले काम करीत असल्याबद्दल व भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे हे गेली १२ वर्षे दिव्यांग बांधवांसाठी अविरत कार्य करीत असल्याने त्यांचा शरद चव्हाण, स्मिता दामले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी डॉ. प्रसाद देवधर यांच्या हस्ते दिव्यांग आघाडीचे जिल्हा पदाधिकारी जिल्हा सहसंयोजक श्यामसुंदर लोट, सुनिल तांबे, सदानंद पावले, सुनिल चव्हाण, संदेश पवार, स्वाती राऊळ, प्रकाश सावंत, विजय कदम, भूषण तुळसकर , मूरारी पाटकर यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

यावेळी मनोगत व्यक्त करताना वेंगुर्ले न. प. नगराध्यक्ष दिलिप गिरप यांनी आज पॅरा ऑलिंपीक मध्ये अपंग मुले, मुली हि चांगली कामगिरी बजावत आहेत त्यामुळे दिव्यांग बांधवांनी अपंगत्व किंवा दिव्यांग हा कमीपणा मानू नये. असे सांगितले. तर अॅड. सुषमा प्रभूखानोलकर यांनी दिव्यांगाकडे पहाण्याचा समाजाचा दृष्ठीकोन बदलला पाहिजे. आज दिव्यांगाना सहानुभूतीची नाहि तर सहकार्याची गरज असल्याचे सांगितले. साहस प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रुपाली पाटील म्हणाल्या की आज दिव्यांग व शासन यामधील दुवा म्हणून साहस प्रतिष्ठान काम करीत आहे. आज दिव्यांगाना तंत्रज्ञानाची मदत मिळाल्यास, दिव्यांग बांधवांच्या बचत गटांना शासनाकडून मार्केट मिळाल्यास दिव्यांग अधिक सक्षम होवू शकतील. तर दिव्यांग आघाडीचे सहसंयोजक श्यामसुंदर लोट यांनी दिव्यांग बांधवांनी कोणताहि न्युनगंड न बाळगता शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून सक्षम व्हावे असे आवाहन केले. अॅड. जी. जी. टाककर यांनी दिव्यांग बांधवांसाठी आपण नोटरीतर्फे कायदेशिर मदत जी काहि लागेल ती मोफत देईन असे सांगितले.

भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे म्हणाले की, शासनाच्या सर्व योजना ज्यावेळी जिल्हयातील सर्व दिव्यांग बांधवापर्यंत पोहोचतील व ज्यावेळी जिल्हयातील सर्व दिव्यांग आर्थिक दृष्ठया सक्षम होतील त्यावेळीच आपल्याला भाजपा दिव्यांग आघाडीचा जिल्हा संयोजक झाल्याचे समाधान मिळेल. आज जिल्हयात शेतकऱयांसाठी कृषि भवन आहे, पत्रकारांसाठी पत्रकार भवन आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग भवन होणे गरजेचे आहे. या मेळाव्याचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलिप गिरप यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार भाजपा जिल्हा सरचिटणिस प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई यांनी मानले. या मेळाव्यात ३०० ते ३५० दिंव्यांग बांधव – भगिनी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 4 =