You are currently viewing आय ए एस ची तयारी दुसऱ्या वर्गापासून 

आय ए एस ची तयारी दुसऱ्या वर्गापासून 

 

फक्त प्रतिदिन एक रुपया शुल्क घेऊन दुसऱ्या वर्गापासून आय ए एस ची तयारी करून घेणाऱ्या डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने यावर्षी या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार येत्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अमरावती परतवाडा रोडवरील वलगाव येथील सिकची रिसॉर्टमध्ये आयोजित केला आहे. हा सत्कार आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांतर्फे तसेच यावर्षी आयएएस झालेल्या विद्यार्थ्यां तर्फे संपन्न होणार आहे.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दिनांक 6 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी व दिल्ली येथे कार्यरत असणाऱ्या श्रीमती भाग्यश्री बानायत ह्या येणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध आयएएस ऑफिसर व अमरावतीचे माजी जिल्हाधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर हे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून दिल्लीच्या सीआरपीएफ चे असिस्टंट कमांडर डॉ. चेतन शेलोटकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. ज्यांना या उपक्रमात भाग घ्यावयाचा आहे त्यांनी नाव नोंदणीसाठी मिशन आयएएसचे संचालक प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्याशी 9890967003 संपर्क साधावा असे आवाहन एका प्रसिद्धीपत्रिकातून करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी बाहेर जाऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांची निवास व भोजन व्यवस्था संयोजकांनी विनामूल्य केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा