You are currently viewing सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ला अभ्यास दौरा संपन्न

सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ला अभ्यास दौरा संपन्न

वैभववाडी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेल्या ३५० किल्ल्यांपैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग हे दोन किल्ले महत्त्वाचे होते.
यापैकी सिंधुदुर्ग किल्ला स्वतः शिवाजीराजांनी उभारला असून विजयदुर्ग किल्ल्याची दुरुस्ती करून विस्तार केलेला होता.
आज या दोन्ही किल्ल्यांची पडझड झाली असून जुने अवशेष नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.


या दोन्ही किल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धनाच्या दृष्टीने अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ आणि सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी ते सोमवार दिनांक २८ फेब्रुवारी असा तीन दिवसाचा स्वच्छता व संवर्धनाच्यादृष्टीने अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष श्री.उमेश झिरपे यांच्या अध्यक्षतेखाली आणि कार्याध्यक्ष श्री.ऋषिकेश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास दौरा संपन्न झाला.


या अभ्यास दौर्‍यात अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे सदस्य व गिर्यारोहक श्री.आशिष माने, सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रकाश भाऊ नारकर, उपाध्यक्ष डॉ.कमलेश चव्हाण, सचिव प्रा.श्री.एस.एन.पाटील, डॉ.संजीव लिंगवत, श्री.रमेश बलुरगी, प्रा.काकासो घोडके, श्री. हर्षल नाडकर्णी, श्री.आनंद बिर्जे, श्री.गुरुनाथ राणे व प्रा.ज्योती बुवा-तोरसकर आदी सहभागी झाले होते.
सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तू आणि त्या वास्तूंची सद्य: स्थितीची पाहणी करून त्यांची स्वच्छता व संवर्धनाच्यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे श्री.उमेश झिरपे यांनी सांगितले. त्यातून जिल्ह्यातील पर्यटन विशेषतः ऐतिहासिक पर्यटन वाढण्यास मदत होईल. शासन आणि जिल्हा गिर्यारोहण संघटनेच्या पुढाकाराने जिल्ह्यातील समविचारी संस्थांच्या सहकार्याने स्वच्छता व संवर्धनाच्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.
जिल्ह्यातील सर्व किल्ल्यांची स्वच्छता व संवर्धनाच्यादृष्टीने त्या भागातील स्थानिक संस्थांच्या सहकार्याने पालकत्व स्वीकारले जाणार आहे, असे श्री.प्रकाश नारकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + nineteen =