You are currently viewing मुटाट शिक्षण संस्थेला देणगी

मुटाट शिक्षण संस्थेला देणगी

प्रशालेत सोलर यंत्रणा होणार कार्यान्वित

तळेरे

मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक डॉ. श्रीधर रघुनाथ लेले यांच्या कन्या डॉ. हेमलता पुरंदरे व त्यांच्या मुली डॉ शिल्पा पुरंदरे, डॉ स्मिता पुरंदरे यांच्या कडून धनादेश नुकताच विद्यालयाचे शिक्षक श्री घुगे यांनी त्यांच्या वतीने संस्था कार्यवाह श्री सुभाषचंद्र परांजपे यांच्याकडे सुपूर्द केला.
सदर देणगीतून संस्थेने काळाची गरज ओळखून ,पर्यावरण पूरक वीज शालेय परिसरात निर्माण करण्यासाठी तीन किलो वॅटची टाटा कंपनी सोलर यंत्रणा बसविण्यासाठी सुरुवात केली आहे .यामुळे संस्थेचे डॉ. हेमलता पुरंदरे शैक्षणिक संकुल विजेच्या बाबतीत स्वावलंबी होणार आहे.जिल्ह्यातील फार कमी शिक्षण संस्थेत सोलर यंत्रणेचा वापर केला जात आहे.
कांही दिवसापूर्वी भारतातील पहिल्या महिला अनुवंश तज्ञ डॉ. हेमाताई पुरंदरे व अमेरिकास्थित त्यांची मुलगी डॉ. स्मिता पुरंदरे यांनी संस्थेच्या शाळा व महाविद्यालयाला भेट देऊन मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने पिण्याच्या पाण्यासाठी आर .ओ. यंत्रणा संस्थेकडे सुपूर्द केली होती. तसेच शैक्षणिक समाधान व्यक्त केले होते .
सध्या मुटाट शिक्षण संस्था हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. यामुळे या देणगीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सदर दातृत्वा बद्दल संस्था कार्यकारी समिती व अध्यक्ष श्री विश्वासराव पाळेकर, उपाध्यक्ष श्री शिवाजी राणे, श्री धनंजय परांजपे ,कार्यवाह सुभाषचंद्र परांजपे,श्री संजय टाकळे,श्री विवेक केळकर, श्री. रघुनाथ पाळेकर ,डॉ. विनय केळकर, देवगड पंचायत समिती सभापती श्री.लक्ष्मण पाळेकर, हीरक महोत्सव अध्यक्ष श्री बळवंतराव राणे, श्री भास्कर पाळेकर ,श्रीकृष्ण सोवनी, मुख्याध्यापक श्री घरपणकर, श्री. घुगे यांनी डॉ. हेमलता पुरंदरे यांच्या परिवाराचे भरीव व नाविन्यपूर्ण योगदानाबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

मुटाट : डॉ.हेमलता पुरंदरे यांच्यावतीने संस्था मुख्य कार्यवाह श्री. सुभाषचंद्र परांजपे यांच्या कडे धनादेश सुपूर्द करताना शिक्षक श्री.घुगे

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 3 =