You are currently viewing आंगणेवाडी जत्रा उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक

आंगणेवाडी जत्रा उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक

सिंधुदूर्ग :

अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर प्रसिद्ध असल्येल्या आंगणेवडीच्या भराडी देवीचा जत्रोत्सव सोहळा २४ फेब्रुवारी गुरुवारी रोजी संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सोमवारी आंगणेवाडी येथे जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या उपस्थितीत यात्रा नियोजन बाबत बैठक पार पडली. भाविकांना सुलभ दर्शन मिळावे या दृष्टीने नियोजन करताना कोरोना नियमावलीचे पालन योग्य पद्धतीने करावे अशा सूचना सर्व विभागाच्या प्रशासन प्रमुख यांना देताना यात्रा परिसराची पाहणी जिल्हाधिकारी यांच्या वतीने करण्यात आली.

यावेळी निवासी जिल्हाधिकारी दत्‍ता भडकवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री बर्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदाराचे अजय पाटणे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, पोलिस अधिकारी सचिन चव्हाण, सरपंच तसेच विविध खात्याचे प्रमुख यासह अंगणवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, प्रकाश आंगणे, अनंत आंगणे, दीपक आंगणे, नंदू आंगणे, रामदास आंगणे, सुधाकर आंगणे, रवी आंगणे, यांच्यासह आंगणे ग्रामस्थ उपस्थित होते.

मागीलवर्षी आंगणे कुटुंबीयांकरिता मर्यादित असलेला यात्रोत्सव यंदा भाविकांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचे पालन करून साजरा करणेबाबत कशा पद्धतीने नियोजन करता येईल. या विषयीची चर्चा बैठकीत करण्यात आली.

मंदिरात एकाच वेळी जास्त गर्दी होणार नाही तसेच भाविकांना देवीचे दर्शन सुलभ व्हावे या करिता मंडळाच्या वतीने नऊ रंगांच्या माध्यमातून नियोजन करण्याच्या सूचना मंडळाला करण्यात आल्या. लक्षणे असणारे भाविकांची थर्मलगनच्या माध्यमातून तपासणी तसेच आवश्यकता वाटल्यास कोरोना तपासणी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला सूचना दिल्या.

अंगणेवाडी मंदिराकडे येणारे मालवण, मसुरे तसेच कणकवली हे तीनही मार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद व ग्राम सडक योजना विभाग आणि सुस्थितीत ठेवावे. आवशक्य ठिकाणी डांबरीकरण, खड्डे बुजवणे, रस्त्याच्या दुतर्फा पांढऱ्या पट्ट्या, साईड पट्टी यासह वाढलेली झाडे तोडण्याबाबत ही संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. अंगणवाडीतील पिण्याच्या पाण्याची स्त्रोत निर्जंतुकीकरण करून ठेवणे परिसर स्वच्छ ठेवणे आदी सूचना देण्यात आल्या. यात्रा उत्सव कालावधीत मोबाईल रेंजची समस्या निर्माण होऊ नये याबाबत बीएसएनएल अधिकाऱ्याने योग्य त्या सूचना देताना त्याविषयी नियोजन करण्याबाबत सांगण्यात आले. यात्रा कालावधीत अग्निशमन यंत्रणा, आरोग्य विभागाकडून वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका यांची व्यवस्था तसेच फिरत्या स्वरूपाची शौचालये, काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची शौचालयेव उभारणी करणे याबाबतची सूचना संबंधित प्रशासनाला देण्यात आल्या.

मागीलवर्षीचा वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता दुकानांना परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र यावेळी दुकानदारांना परवानगी देण्याबाबत प्रशासनाने सकारात्मकता दाखवली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने रस्ता मार्ग सोडून दुकानांना परवानगी देण्याचे नियोजन करावे व वीज वितरण योग्य ती काळजी घेऊन दुकानांना वीजपुरवठा उपलब्ध करून घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

आंगणेवाडी जत्रेसाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी येतात. म्हणून रेल्वेस्थानक मार्गावरून आंगणेवाडी पर्यंत शक्य असल्यास शिवशाही बस सोडण्याबाबत एसटी प्रशासनाने नियोजन करावे तसेच आंगणेवाडी मंदिरापासून मालवण, कणकवली या ठिकाणाहून बसेस चे नियोजन करावे, अशा सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. यात्रा कालावधीत पोलिस प्रशासनाने योग्य तो बंदोबस्त ठेवावा. यात्रा परिसरात वाहनांना परवानगी मिळणार नाही. याबाबत नियोजन करण्यात यावे. पार्किंग मंदिराबाहेरील परिसरात पोलिस व स्वयंसेवकांची नियुक्ती असावी. मंदिरात दर्शनासाठी जास्त गर्दी होणार नाही. याबाबत मंडळांनी नियोजन करावे, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

आज आंगणेवडी जत्रेच्या नियोजनाबाबत प्राथमिक स्तरावरची बैठक घेण्यात आली. आजच्या बैठकीत देण्यात येणाऱ्या सूचना व नियोजन याबाबत पुढील आठवड्यात बैठक घेऊन कोणत्या प्रकारे अंमलबजावणी सुरू आहे याचा आढावा घेतला जाईल. तसेच आगामी काळात पालकमंत्री ही यात्रा नियोजन याबाबत बैठक घेतील अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − one =