You are currently viewing नगरपंचायत व्यापारी मित्रमंडळातर्फे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचे स्वागत

नगरपंचायत व्यापारी मित्रमंडळातर्फे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचे स्वागत

कणकवली

नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ (आप्पासाहेब पटवर्धन चौक) मध्ये शनिवारी दि. ११ रोजी श्री सत्यनारायणाची महापुजेचे च्या कार्यक्रमात जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत.
आज उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळाला भेट दिली.त्यावेळी नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यावेळी सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कृष्णा निकम, देवेंद्र पिळणकर, गणेश गजबार,भिकाजी निकम, उपस्थित होते.
नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, व्यापारी बांधवांच्या सोबत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा