You are currently viewing वैभववाडीत आम. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

वैभववाडीत आम. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

वैभववाडी :

तालुक्यात भाजपा आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. माजी नगरसेवक संताजी रावराणे पुरस्कृत 23 जून रोजी तालुक्यात 10 वी व 12 वी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम होणार आहे. सदर कार्यक्रम वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह कलादालन याठिकाणी संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाला वैभववाडी तहसीलदार रामदास झळके, पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह इतर अधिकारी तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संताजी रावराणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − twenty =