You are currently viewing स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांची माजगाव येथे ९७ वी जयंती साजरी…

स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांची माजगाव येथे ९७ वी जयंती साजरी…

सावंतवाडी

येथील माजी आरोग्यमंत्री स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या समाधी स्थळी त्यांच्या ९७ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्यांचेे सुपुत्र विकास सावंत यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान आणि राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी भाईंच्या स्मृतीला उजाळा दिला. यावेळी भाईसाहेब सावंत यांचे पणतू कु. कबीर विक्रांत सावंत आवर्जून उपस्थित होते. तसेच काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी विभावरी सुकी, चंद्रकांत नाईक, शामराव माने, मनोहर वेंगुर्लेकर,दिनेश नागवेकर, उद्योजक डी.के.सावंत, सोनू सावंत, मुख्याध्यापक बाजीराव मानेेेे सुधीर मल्हार तसेच राणी पार्वतीदेवी हायस्कूलचे शिक्षक, जुनिअर कॉलेजचे प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा