You are currently viewing प्राथमिक आरोग्य केंद्र सडूरे संघर्ष कृती समिती अध्यक्ष पदी माजी सरपंच विजय रावराणे तर सचिव पदी उपसरपंच नवलराज काळे यांची ग्रामसभेत एकमताने निवड

प्राथमिक आरोग्य केंद्र सडूरे संघर्ष कृती समिती अध्यक्ष पदी माजी सरपंच विजय रावराणे तर सचिव पदी उपसरपंच नवलराज काळे यांची ग्रामसभेत एकमताने निवड

*प्राथमिक आरोग्य केंद्र सडूरे संघर्ष कृती समिती अध्यक्ष पदी माजी सरपंच विजय रावराणे तर सचिव पदी उपसरपंच नवलराज काळे यांची ग्रामसभेत एकमताने निवड*

*उपसरपंच नवलराज काळे यांच्या संकल्पनेतून करण्यात आली स्थापना*

*वैभववाडी -*

प्राथमिक आरोग्य केंद्र सडूरे मंजुरी व प्रत्यक्ष इमारत काम सुरू होऊन पूर्ण होणे करता व सुविधा मिळणे करता पाठपुरावा करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सडूरे संघर्ष कृती समितीची उपसरपंच नवलराज काळे यांच्या संकल्पनेतून करण्यात आली स्थापना. ही समिती अराजकीय असेल व प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्णत्वास जाण्यासाठी संबंधित विभाग, मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी थेट संपर्क साधेल वेळ पडल्यास लोकशाही मार्गाचा अवलंब करेल या प्रत्येक हालचाली मध्ये जनतेच्या सहकार्याची अपेक्षा राहील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्णत्वास जाण्यासाठी समितीसहित सर्व जनतेने कटिबद्ध रहाव अस आवाहन समिती सचिव उपसरपंच नवलराज काळे यांनी उपस्थित जनतेला केले. प्राथमिक आरोग्य केंद्र सडूरे यजमान गाव म्हणून आपल्या ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा व ही चळवळ जिवंत ठेवावी यासाठी या समितीची स्थापना झाली आहे इतर आजूबाजूच्या कुर्ली अरुळे,निमअरुळे, सांगुळवाडी(मगामवाडी) नावळे, एडगाव वायंबोशी गावचे सरपंच/उपसरपंच/ग्रामपंचायत सदस्य / गावातील होतकरू समाजसेवक यांपैकी 2 व्यक्ती ची या समितीवर सदस्य म्हणून निवड राहील
असा ठराव ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे च्या ग्रामसभेमध्ये उपसरपंच नवलराज काळे यांच्या सूचनेने घेण्यात आला. या सूचनेला माजी सरपंच विजय विनायक रावराणे यांनी अनुमोदन दिले तर सदर ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी ग्रामसभेतून प्राथमिक आरोग्य केंद्र सडूरे संघर्ष कृती समिती करण्यात आली ती खालील प्रमाणे
1) अध्यक्ष श्री विजय विनायक रावराणे माजी सरपंच
2) सचिव श्री नवलराज विजयसिंह काळे (उपसरपंच)
3) उपाध्यक्ष दीक्षा दत्तराम राव राणे (माजी ग्रामपंचायत सदस्या)
समिती सदस्य खालील प्रमाणे
4) सरपंच दीपक यशवंत चव्हाण
5)ग्रामपंचायत सदस्या विशाखा नवलराज काळे
6)ग्रामपंचायत सदस्य महेश अमृत जंगम
7) माजी उपसरपंच संतोष लक्ष्‍मण पाटील
8)सोसायटी चेअरमन विजय पंडित रावराणे
9) समाजसेवक महेश सूर्यकांत डेळेकर
10) समाजसेवक लक्ष्मण(नाना) भागोजी बोडेकर
11) समाजसेवक उदय गोविंद रहाटे

12 सदस्य हे आजूबाजूच्या गावातून असतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा