You are currently viewing कणकवली – जाणवली जोडणाऱ्या पुलास शासकीय मंजुरी प्राप्त

कणकवली – जाणवली जोडणाऱ्या पुलास शासकीय मंजुरी प्राप्त

कणकवली – जाणवली जोडणाऱ्या पुलास शासकीय मंजुरी प्राप्त

८ कोटींच्या निधीस मंजुरी – मा. नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली :

कणकवली आणि जाणवली गावाला जोडणाऱ्या पुलास मंजुरी मिळाली आहे.  कणकवली शहराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नारायण राणे,पालकमंत्री रविंद्र चव्हाण,आ.नितेश राणे यांच्या माध्यमातून हा पुल मंजूर झाला. या पुलासाठी ८ कोटी ८ लाख मंजूर झाल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली.

येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अण्णा कोदे उपस्थित होते.

समीर नलावडे म्हणाले,गेली ५ वर्षे आम्ही या पुलाच्या कामासाठी झगडत होतो.या पुलासाठी ८ कोटी ८ लाख रुपये मंजूर झाले असून या पुलाच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. जाणवली आदर्शनगर या रस्त्याला हे पुल जोडले जाणार आहे.बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये जाणाऱ्या मुलांसाठी हा पर्यायी मार्ग झाला आहे.

कणकवली शहरात हे एक विकासात्मक पाऊल आहे. त्या पुलाची ८० लांबी , रुंदी ११.६७ मीटर आहे.पुलाची उंची ६ मिटर असून त्याच्या बांधकामासाठी मुदत एक वर्ष आहे.या पुलाला पाणी साठण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.हे पुल होत असताना पर्यटन दृष्टीने लाभ होणार आहे. रिंग रोड लागून जात आहे.अनेकांचे येणे जाणे सोयीचे होईल.महायुतीने हा पूल मंजूर केला.पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि आ.नितेश राणे यांच्यामुळेच हा निधी मिळाला आहे .

माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे म्हणाले,कणकवली शहराचा उत्तर हा भाग पुलाचा येणार आहे.कणकवली शहरात येणारा ग्राहक येतो ते पटवर्धन चौकात येतो.आता या पुलामुळे जाणवली कडील ग्राहक वरच्या बाजारपेठेत येईल,त्यामुळे उर्जिवस्था येण्यासाठी हा दुसरा मार्ग आहे.पर्यटनदृष्ट्या प्रगती होईल.अनेकांनी यापूर्वी फोटो काढत देखावा केला होता.मात्र,हे पुल आता निधी मंजूर झाला आहे.भविष्यात हे पुल विकासासाठी माईलस्टोन ठरेल.लहान मुलांना स्कूल मध्ये जाण्यासाठी सोयीचे होईल.पावसाळ्यापूर्वी हा पुल मंजूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.विशेषतः कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचे आभार मानले पाहिजे.त्यांनी तांत्रिक दृष्ट्या प्रयत्न केले, त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे.अत्यंत कमी वेळात या पुलाला निधी मंजूर होवून निधी प्राप्त झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × one =