You are currently viewing भराडी देवीच्या मंदिरात सहा डिसेंबर पासून देवीची ओटी भरणं बंद

भराडी देवीच्या मंदिरात सहा डिसेंबर पासून देवीची ओटी भरणं बंद

*वार्षिक उत्सवात ओटी भरल्यावर भाविकांना ओटी भरता येणार*

 

मालवण :

प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेच्या मंदिरात ६ डिसेंबर २०२१ पासून देवीची ओटी भरणे विधी बंद राहणार आहे.

प्रथेप्रमाणे देव दिवाळीच्या दुसर्‍या दिवसा पासून ते श्री देवी भराडी मातेच्या वार्षिक उत्सवात देवीची प्रथम ओटी भरे पर्यत देवीची ओटी भरणे, गोड पदार्थ ठेवणे, नवस फेडणे, इ. धार्मिक कार्यक्रम बंद राहणार आहेत.

वार्षिक उत्सवात ओटी भरल्या नंतर सर्व भाविकांना ओटी भरता येणार आहे. भाविकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा