You are currently viewing ”रामचंद्र देखणे हे आधुनिक संत होते. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.”: अध्यक्ष -शिवाजीराव शिर्के

”रामचंद्र देखणे हे आधुनिक संत होते. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.”: अध्यक्ष -शिवाजीराव शिर्के

 

प्राधिकरण-कॅप्टन कदम सभागृह, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे शुक्रवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२२ रोजी पिंपरी चिंचवड साहित्य मंच आणि शब्दरंग साहित्य कट्टा या संस्थांनी मिळून डाॅ. देखणे सरांच्या श्रध्दांजलीचा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी, रामचंद्र देखणे यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली.
मान्यवरांनी आपल्या भाषणात श्रध्दांजली अर्पण करताना आपले मनोगत व्यक्त केले.
शैलजाताई मोरे म्हणाल्या “वर्षभर आठवणीत राहील असे उपक्रम साहित्यिकांनी राबवावे. त्यांना योग्य ते सहकार्य करू.”
चंद्रशेखर जोशी म्हणाले “देखणे सर देवलोकांना आनंदित ठेवण्यासाठी गेले असावेत.”
प्रकाश ढवळे म्हणाले, “लोकसाहित्याच्या सोबत शाहिरांसाठी सुद्धा देखणेसरांनी प्रचंड काम केले आहे.”
नाना शिवले म्हणाले, ” त्यांचे वाङमय हा भविष्याचा ठेवा आहे.”
सलिमभाई शिकलगार म्हणाले,”देखणेसरांच्या विचाराची जपवणूक व्हावी.”
राजेंद्र घावटेंनी आपल्या वक्तव्यातून सागितले,” प्राधिकरणातील सर्व पेठांना पवित्र नद्याचे नाव देण्याची संकल्पना देखणे सरांची होती. ”
बाबू डिसोजा यांनी ४७ वर्षे रामभाऊदेखणे यांच्या
मैत्री विषयी सांगितले. रामभाऊ चे हस्ताक्षर जणू मोती होते. महाविद्यालयीन जीवनातील अनुभव सांगितले. तो उत्तम चित्रकार होता. त्याने दूरदर्शन आयोजित महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत त्याची भाकर ही एकांकिका सादर केली. मी त्यात भूमिका केली होती. पहाट संस्थेचे पहिले संमेलन त्याने आयोजित केले. दोस्ती दिवाळी अंकासाठी परिश्रम घेतले.

रामभाऊ देखणे यांचे भाचे सचिन गटणे यांनी लहानपणीच्या आठवणीतून कसे घडलो हे सांगितले.

संवेदना प्रकाशनाचे मा.नीतीन हिरवे यांनी देखणे सरांची अनेक पुस्तके प्रकाशित केली. चिखली येथे होणाऱ्या संतपीठास त्यांचे नाव देण्यात यावे असे त्यांनी म्हटले.
शोकाकुल अशोक कोठारी, सूर्यकांत मुथियान, प्रमोद पवार, कैलास भैरट, नागेश चव्हाण, सुप्रिया सोळांकुरे, आनंदराव मुळीक, नरहरी वाघ, माधुरी डिसोजा, प्रा.नुतन आपटे, मधुश्री ओव्हाळ यांनी डाॅ.देखणेंच्या आठवणींना उजाळा दिला.
प्राधिकरण मध्ये राहणारे अनेक नागरिक या प्रसंगी उपस्थित होते. श्रध्दांजली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राज अहेरराव यांनी केले.7

प्रतिक्रिया व्यक्त करा