You are currently viewing फोंडाघाट परिसरात श्री राम जन्मोत्सव उत्साहात साजरा

फोंडाघाट परिसरात श्री राम जन्मोत्सव उत्साहात साजरा

फोंडाघाट परिसरात श्री राम जन्मोत्सव उत्साहात साजरा

फोंडाघाट

फोंडाघाट परिसरातील ठिकठिकाणी आज रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .रामनवमी निमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले असून आज फोंडाघाट परिसर रामनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
फोंडाघाट येथील साई मंदिरात सालाबाद प्रमाणे मोठ्या प्रमाणावर उत्साहात रामनवमी च्या उत्सवा च्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी 6 वा.श्री साईबाबांची काकड आरती,6.30 वा.श्री साईबाबा न वर अभिषेक,7.30 वा. साईबाबांची आरती,दुपारी 12.35 ला रामजन्मोत्सव ,दुपारी 1 नंतर महाप्रसाद,दुपारी 2 वा. पासून साई सच्चरित्राचे पारायण,सायंकाळी 4 वा.नंतर पोभुर्ले घाडीवाडी येथील श्री महालक्ष्मी ढोलपथक च्या सहभागाने श्री साईबाबांची पालखी मिरवणूक वाजतगाजत साईमंदिर ते राधाकृष्ण मंदिर अशी काढण्यात आली.त्यानंतर रात्रौ 8 वा पासून संगीत भजनाचे आयोजन करण्यात आले होते तर रात्रौ 10 वाजता स्थानिक कलाकारांचे मालवणी सौभद्र हे तुफान विनोदी नाटक ठेवण्यात आले होते.

तसेच फोंडाघाट श्री पाचोबा देवस्थान याठिकाणी ही सालाबादप्रमाणे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आग्रे यांच्या सौजन्याने श्री देव पाचोबा मित्रमंडळाकडून रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने श्री सत्यनारायण महापूजा घालण्यात आली होती त्यांनतर दुपारी भाविकांसाठी महाप्रसाद,दुपारी 3 ते 6 महिलांसाठी हळदीकुंकू,सायंकाळी महिलांसाठी 6 ते 8 होम मिनिस्टर स्पर्धा,रात्रौ.8 नंतर स्थानिक भजने, रात्रौ 10 वा.नंतर मु.राशिवडे,ता.राधानगरी येथील बुवा नागेश पाटीला यांच्या श्री स्वामी कृपा अमृत भजन मंडळाचे सुश्राव्य भजन करण्यात आले.

दरम्यान श्री देव पाचोबा येथील रामनवमी उत्सव कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण राहिले ते संपूर्ण श्री देव पाचोबा देवस्थानाला करण्यात आलेली आकर्षक फुलांची सजावट आणि प्रभू श्री रामाचे रेखाटलेले वाळू शिल्प.

अशाप्रकारे आज फोंडाघाट ठिकठिकाणी ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा