भाजपला धक्का; राणे समर्थकांचा सेनेत प्रवेश

भाजपला धक्का; राणे समर्थकांचा सेनेत प्रवेश

देवगड

तालुक्यातील रहाटेश्वर ग्रामपंचायत बिनविरोध शिवसेनेकडे आलीय. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत रहाटेश्वर ग्रामपंचायत बिनविरोध जाहीर झाली. यावेळी तालुकाप्रमुख विलास साळसकर, मिलींद साटमही होते उपस्थित.

रहाटेश्वर ग्रामपंचायत मधील ७ पैकी ४ ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेचे बिनविरोध आले. त्यातील ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास गुरव हे अपक्ष निवडुन आले होते. त्यांनी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे रहाटेश्वर ग्रामपंचायत शिवसेनेकडे बिनविरोध आली. तसेच रहाटेश्वर मधील भाजपा राणे समर्थक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश शिवसेना पक्षात केला. त्यावेळी ग्रा. पं. सदस्य जयप्रकाश गुरव, श्रीनिवास गुरव, कल्पना कदम, प्रतीक्षा धुरी, शाखाप्रमुख दीपक कदम, सखाराम कदम व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रवेश केलेल्या पैकी प्रकाश भावे, रोहिदास कदम, महेश कदम, विलास कदम, अशोक पांचाळ तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा