You are currently viewing मराठा समाज मंडळातर्फे सावंतवाडी येथील काजी शहाबुद्दिन हॉल येथे ११ डिसेंबरला वधू – वर मेळावा

मराठा समाज मंडळातर्फे सावंतवाडी येथील काजी शहाबुद्दिन हॉल येथे ११ डिसेंबरला वधू – वर मेळावा

सावंतवाडी

मराठा समाज उत्कर्ष मंडळातर्फे येत्या 11 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय वधू वर सूचक मेळावा व समाजबांधवांचा स्नेहा मेळावा व गुणगौरव सोहळा सावंतवाडी येथील काजी शहाबुद्दिन हॉल येथे दुपारी 2 ते 5 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.मराठा समाजातील जास्तीत जास्त वधू वर तसेच इतर बहुजन समाजातील व्यक्तीही या मेळाव्यात लाभ घेऊ शकतात असा हा मेळावा घेण्यात येणार आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.

सांगेली येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सावंतवाडी, दोडामार्ग तालुका मराठा समाज उत्कर्ष मंडळा ची बैठक झाली या मंडळाची बैठक गावातील पंचक्रोशी वर तालुक्यात दर तीन महिन्यांनी तालुक्यातील ग्रामीण भागात जाऊन बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.त्यानुसार ही पहिली बैठक या गावात झाली. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष दत्ताराम सडेकर, सचिव एडवोकेट संतोष सावंत, खजिनदार भुपेंद्र सावंत, उपाध्यक्ष पंढरी राऊळ, सहसचिव विनोद सावंत, मकरंद तोरस्कर, साई हवालदार, सत्यजित धारणकर, सुहासिनी सडेकर, मेघना राऊळ, उज्वला सावंत, दत्ता सावंत, भक्ती सावंत, संजना परब, विश्वनाथ राऊळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ज्यांना या मेळाव्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी खजिनदार भूपेंद्र सावंत सावंतवाडी चितारआळी, ओंकार फोटो स्टुडिओ येथे आपले अर्ज व नाव नोंदणी करावी असे ठरवण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा