You are currently viewing MNGL च्या पाईप लाईनमुळे मणेरीत रस्ता खचला; उपाययोजना न केल्यास उपोषणाचा इशारा

MNGL च्या पाईप लाईनमुळे मणेरीत रस्ता खचला; उपाययोजना न केल्यास उपोषणाचा इशारा

शिवसेना पदाधिकाऱ्यांचे बांधकाम विभागाला निवेदन

दोडामार्ग

तालुक्यात बांदा ते आयी राज्यमार्गावर MNGL ची गेस पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू होते, संबंधित ठेकेदाराने हे काम पावसाळा तोंडावर आहे म्हणून घाई गडबडीत उरकून घेतले होते, रस्त्याच्या बरोबर बाजूला खोदकाम करून ही लाईन टाकण्यात आली आहे. मात्र साईडपट्टी पूर्ववत न केल्याने रस्ता खचण्याचे प्रमाण वाढले आहे, मणेरी बाजार पेठ ते कुबलवाडी पर्यंतचा रस्ता अशाच निकृष्ट कामामुळे खचला आहे. यावर योग्य उपाययोजना न केल्यास उपोषणाचा इशारा शिवसेना पदाधिकारी दोडामार्ग यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी शिवसेना युवासेना तालुका समन्वयक भगवान गवस, मणेरी उपसंरपच सुधिर नाईक, मणेरी उपविभागप्रमुख शिवराम मोरलेकर, दोडामार्ग शिवसेना कार्यालय प्रमुख गुरुदास सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − 13 =