You are currently viewing श्री देव घोडेमुख देवस्थानचा जत्रोत्सव ८ डिसेंबर रोजी…

श्री देव घोडेमुख देवस्थानचा जत्रोत्सव ८ डिसेंबर रोजी…

वेंगुर्ले

कोकणातील जत्रोत्सव म्हणजे कोकणवासीयांसाठी एक वेगळीच पर्वणी असते. कोकणात साजर्‍या होणार्‍या विविध जत्रोत्सवांपैकी श्री देव घोडेमुख जत्रोत्सव हा आगळावेगळा जत्रोत्सव असतो. जागृत देवस्थान असणार्‍या वेंगुर्ले – सावंतवाडी तालुक्याच्या सीमेवर असणार्‍या या श्री. देव घोडेमुख देवस्थानचा जत्रोत्सव यंदा ८ डिसेंबर रोजी होणार आहे.

कोंब्यांची जत्रा म्हणून ओळखल्या जाणार्‍या या जत्रोत्सवात कित्येक कोंबड्यांचा बळी दिला जातो. अगदी घाटमाथ्यावरूनही भाविक या उत्सवासाठी येत असतात. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करून जत्रोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन उत्सव समितीने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा