You are currently viewing ‘बेलबॉटम’ अक्षयकुमारचा लॉकडाउनंतरचा पहिला सिनेमा, फोटो क्लिकसाठी ग्लासगोमध्ये रांग..

‘बेलबॉटम’ अक्षयकुमारचा लॉकडाउनंतरचा पहिला सिनेमा, फोटो क्लिकसाठी ग्लासगोमध्ये रांग..

ग्लासगो:

 

‘बेलबॉटम’ या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी ग्लासगोमध्ये बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार दाखल झाला आहे. त्यावेळी शूटिंग मधून थोडे फ्री होऊन हॉटेलच्या बाहेर चाहत्यांसोबत फोटो क्लिक करतानाचा व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये विशेषत: धक्काबुक्की न करता तेथे शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या आवडत्या अभिनेत्यासोबत फोटो मिळावा, म्हणून चाहत्यांनी रांग लावली आहे. त्यांची शिस्त पाहून अक्षय कुमारने एकेकासोबत फोटो क्लिक करत व त्यांच्याशी थोडी चर्चा करत सर्व चाहत्यांना खूश केले आहे. कोणालाही नाराज न करता सर्वांसोबत फोटो क्लिक करण्याची संधी दिल्याने चाहत्यांसाठी अक्षय कुमार खरा हिरो ठरला आहे.

 

‘बेलबॉटम’ हा सिनेमा रंजीत तिवारी यांनी दिग्दर्शित केलेला असून यामध्ये वाणी कपूर, लारा दत्ता, हुमा कुरेशी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. तर लॉकडाऊननंतर देशाबाहेर शूटिंगसाठी गेलेला व सर्वात आधी शूटिंगला सुरुवात करणारा बेलबॉटम हा पहिला सिनेमा ठरला आहे. त्यानंतर अक्षय कुमार स्कॉटलंडमधील या चित्रपटाचे शुटींग संपवून पुढील प्रोजेक्टसाठी तो लवकरच मुंबईत येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा