You are currently viewing शिवसेनेचा जिल्हा परिषद मतदारसंघात उद्या विभागीय आढावा घेण्यासाठी दौरा

शिवसेनेचा जिल्हा परिषद मतदारसंघात उद्या विभागीय आढावा घेण्यासाठी दौरा

इच्छुक उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन – रुपेश राऊळ

सावंतवाडी

शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत व जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद निहाय मतदार संघात विभागीय आढावा घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली गठीत करण्यात आलेली कमिटी उद्या २१ नोव्हेंबरला तालुक्यात दौरा करणार आहे. अशी माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली. दरम्यान या दौऱ्यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती इच्छुक उमेदवारांसह विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. याबाबत श्री.राऊळ यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.
त्यात नमूद करण्यात आलेला दौरा पुढीलप्रमाणे. माजगाव जि प स.10.00 वा., असनिये साकव भूमिपूजन स.11.00 वा., आंबोली पं. स. दु.1.00 वा., विलवडे पं. स. संध्या 4.00 वा., माडखोल जि प संध्या5.30 वा., कोलगाव जि प संध्या.6.30 वा.

प्रतिक्रिया व्यक्त करा