You are currently viewing आडाळी (दोडामार्ग) येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल प्लांट (NIMP) प्रकल्प राबविणार…..

आडाळी (दोडामार्ग) येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल प्लांट (NIMP) प्रकल्प राबविणार…..

– वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री ना. राजेंद्र श्यामगौडा पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक संपन्न

मुंबई
मौजे आडाळी, तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग येथे National Institute of Medicinal Plant (NIMP) प्रकल्प राबविण्याबाबत महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री ना. राजेंद्र श्यामगौडा पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत काल (20 ऑक्टोबर) ला मंत्रालय येथे बैठक पार पडली.

बैठकीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी National Institute of Medicinal Plant (NIMP) प्रकल्प मौजे आडाळी, तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग येथेच राबविण्यात यावा अशी आग्रही मागणी केली. राज्यमंत्री यांनी देखील सदर मागणीला दुजोरा देत मौजे आडाळी येथेच प्रकल्प राबविण्याबाबत संबंधित अधिकारी यांना तात्काळ आवश्यक तो प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे तातडीने पाठविण्यात यावा, असे आदेश दिलेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + seventeen =