You are currently viewing रोग प्रतिकार शक्ती

रोग प्रतिकार शक्ती

रोग निर्माण झाल्यावर त्याला प्रतिकार करणाऱ्या शरीराच्या नैसर्गिक शक्तीला रोग प्रतिकारक शक्ती असे म्हणतात. रोग प्रतिकारक शक्ती कमी व्हायला तीन मुख्य कारणे आहेत

तणाव

चुकीची जीवन शैली

वय

साठ साल के जवान या पच्चीस साल का बुढ्ढा ही जाहिरात पाहिली की जाणवते की हल्ली तरुण मुलांमध्ये सुद्धा रोग प्रतिकार शक्ती कमी असेल तर सर्दी पडसे ताप थकवा जाणवणे हे आजार सर्रास आढळून येतात. आपल्या धावत्या जीवन शैलीत बदल करणे शक्य नसते त्यामुळे तणाव व्यवस्थापन हा मुद्दा कळीचा ठरतो . संशोधनातून सिद्ध झाले आहे की सर्व रोगांना कारणीभूत तणाव असतो .आपल्या आजूबाजूला काही बदल घडत असतात . प्रतिकूल बदल घडला की तणाव निर्माण होतो .फाजील किंवा कमी आत्मविश्वास आती हळवेपणा किंवा न्यूनगंड असलेल्या व्यक्तीचा तणाव लगेच वाढतो. कामाच्या ठिकाणची परिस्थिती ,घरातील वातावरण , आर्थिक व सामाजिक स्थिती ह्यावर तणाव अवलंबून असतो .
परिस्थिती प्रतिकूल असली तरी त्याला कसा प्रतिसाद द्यायचा हे निवडण्याची क्षमता आपल्या तणावमुक्त आयुष्याची गुरुकिल्ली आहे . तणावाचे खरे कारण मनातच असते .

अवघा आनंदी आनंद
मना घेई हाचि छंद
न लगे धन संपदा
शुद्ध बुद्धी देई सदा

काहीही प्रतिकूल घडो मनाला आनंदी ठेवणे गरजेचे आहे . सकारात्मक विचार करणे ,हसत खेळत राहणे ,गरजा कमी करणे, साधे सोपे जगणे ,कुणाची उपेक्षा न करणे , कुणाकडून अपेक्षा न ठेवता निरपेक्ष सेवा करणे आपला तणाव कमी करण्यासाठी मोलाच्या गोष्टी आहेत .तणाव वाढला की रोग प्रतिकारक शक्ती खूप कमी होते .शक्यतो तणाव निर्माणच होणार नाही असे पाहावे .मी माझ्या कवितेतून हाच संदेश दिला आहे .

हॅप्पी हॅप्पी राहून तोडून टाक चुप्पी
हसायला कुठे लागते रे नोटांची थप्पी

हसण्या मुळे तणाव निवळतो , मन प्रसन्न राहते , कामातील उत्साह टिकून राहतो म्हणून हसत राहावे शरीर जसे बाहेरून साफ करतो तसेच आतून साफ असणे गरजेचे आहे .त्याने शरीरातील विष द्रव्ये बाहेर पडतात . जे शरीर आतून साफ आहे त्या शरीरात रोग उत्पन्नच होणार नाहीत .तसेच मनाचीही सफाई करावी .वाईट विचार मनात येवू द्यायचा नसेल तर चांगले वाचावे चांगले ऐकावे चांगले तेच पहावे . शक्यतो चटपटीत चायानिज विदेशी खाणे टाळावे . रात्रीचे जेवण कमी करावे . मधून मधून उपवास करावा . पाणी भरपूर प्यावे . आपला व आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहील हे पाहावे .

रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याचे सोपे उपाय –

१) भरपूर प्रमाणात आवळ्याचे सरबत लोणचे मुरब्बा च्यवनप्राश कँडी ज्यूस ह्या पैकी आवडेल ते सेवन करावे .

२) रात्री झोपताना एक चमचा अश्वगंधा एक कप गरम दुधातून घेणे .

३) अर्धा चमचा हळद थोडा गूळ टाकून गरम दुधातून घेणे .

४) एक चमचा गिलोय एका ग्लास भर गरम पाण्यातून उपासी पोटी घेणे .

५) अर्धा लिटर पाणी  अर्धा चमचा हळद व दहा बारा पुदिन्याची पाने एकत्र उकळवून पाणी अर्धे शिल्लक राहिले की ते गार झाल्यावर दोन चमचे मध टाकून हे पेय कधीही पिणे .

६) सर्वात सोपा उपाय म्हणजे खरवस आहारात घेणे .जेंव्हा गाय किंवा म्हैस वासराला जन्म देते तेंव्हा वासराने विविध रोगांशी सामना करावा म्हणून पहिले तीन दिवस जे दूध येते ते खूप दाट असते .त्यात कोलोस्त्रोम नावाचा घटक असतो .ज्याने रोग प्रतिकारक शक्ती जबरदस्त वाढते .त्या दुधासरखे इम्मुनिटी बूस्टर कुठलेही नाही .एक लिटर चिक (खरवसाचे दूध ) एक कप साधे दूध तीनशे ग्राम गूळ शंभर ग्रॅम साखर व इलायची थोडी पूड हे मिश्रण उकळून त्याच्या वड्या कराव्यात . खरवस कमी प्रमाणात पण वरचेवर खावा . आजकाल कोलोस्त्रम च्या कॅपसुल गोळ्या व पावडर देखील मिळते. वरील विवेचनावरून लक्षात आले असेल की निरोगी जीवन जगायचे असेल तर तणाव मुक्त जगा. हसत खेळत जगा . शरीर शुद्धी साठी वरचेवर पंचकर्म उपचार करून घ्या. मन शुद्ध ठेवा .म्हणतात ना – मन चंगा तर काठवट मे गंगा . चांगला सात्विक विचार आहार विहार करावा . म्हणजे आपोआप रोग प्रतिकारक शक्ती वाढेल .

शुभम भवतू

विलास कुलकर्णी
मीरा रोड
750684864

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + twenty =